Gokul Election Result : "सतेज पाटील फेक नरेटिव्ह पसरवण्यात यशस्वी"; गोकुळमध्ये भाजपचा सुपडासाफ झाल्यानंतर धनंजय महाडिकांची पहिली प्रतिक्रिया

Gokul Election Results: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील निकालानंतर धनंजय महाडिक यांनी पराभव अनपेक्षित असल्याचे सांगितले. महायुती मतदारांपर्यंत पोहोचण्यात कमी पडल्याची कबुली देत त्यांनी सतेज पाटील यांच्यावर फेक नरेटिव्हचा आरोप केला.
Satej Pati Vs Dhananjay Mahadik
Satej Pati Vs Dhananjay MahadikSarkarnama
Published on: 
Updated on: 

Gokul Election News : "मतदारांपर्यंत पोहोचण्यात आणि महायुतीची भूमिका समजावून सांगण्यात आम्ही कमी पडलो. मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाले असून, जमिनीवरील परिस्थितीचा अंदाज आम्हाला आला नाही", अशी कबुली भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. गोकुळ दूध संघ निवडणुकीतील निकालानंतर पराभव मान्य करत महायुतीच्या कामगिरीवर आत्मचिंतन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

महाडिक म्हणाले, काँग्रेस आमदार सतेज पाटील नेहमी फेक नरेटिव्ह तयार करतात. त्यांच्या वक्तव्याला बेस नाही. सगळे निर्णय कोल्हापुरातच घेतले जाणार होते. मुंबईला जाण्याचं कारण नव्हतं. प्रचारात त्यांनी आघाडी घेतली होती. चुकीच्या गोष्टी सांगण्यात ते यशस्वी ठरले, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातील भाजप कार्यालयात बोलताना दिली.

गोकुळचा निकाल अतिशय अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. मतदारांपर्यत पोहचणे, मतदारांना समजावून सांगणे यामध्ये आम्ही कमी पडलो. महायुतीच्या काही गोष्टी लोकांना पटल्या नाहीत. त्यामुळे मोठ्याप्रमाणात क्राॅस वोटींग झालं आहे. ग्राऊंडवरचा अंदाज आम्हाला आला नाही. मात्र मतदारांनी जो निकाल दिला आहे, तो आम्ही मान्य केला आहे, असे महाडिक म्हणाले.

Satej Pati Vs Dhananjay Mahadik
Gokul Election : गोकुळच्या सत्तासंघर्षात महायुतीतील नेत्यांनीच एकमेकांचा काटा काढला? अध्यक्षपदाच्या सगळ्या दावेदारांचा गेम!

आम्ही आत्मचिंतन करायच ठरवले आहे. भविष्यात चांगल्या कामाला सहकार्य आणि चूक असेल त्याठिकाणी विरोध केला जाईल. अजून आम्ही पराभव कसा झाला याचे विश्लेषण केलं नाही. हसन मुश्रीफ यांनी कदाचित विश्लेषण केलं असेल त्यामुळे त्यांनी वक्तव्य केलं असाव. पण आम्ही अजून याचा अभ्यास केला नाही. नव्यांना जुने पसंत नव्हते, जुन्यांना नवे पसंत नव्हते असं झालं असेल. त्याच एक कारण देता येणार नाही, पण आम्ही कमी पडलो आहोत. आता या निकालानंतर आम्ही पुढे जाण्याचं ठरवलं आहे, असेही धनंजय महाडिक यांनी सांगितले.

Satej Pati Vs Dhananjay Mahadik
BJP Vs ShivSena : मंत्री गणेश नाईकांना एकनाथ शिंदेंचा धक्का : नगरविकास खात्याने भाजपचा क्लस्टर स्थगिती ठराव गुंडाळला

शौमिका महाडिक यांनी गेली 5 वर्षे विरोधक म्हणून काम केलं आहे. शौमिका स्टेट फॉरवर्ड आहेत. महायुतीच मनोमिलन होण्यामध्ये देखील खूप कालावधी गेला. आमच्यात खूप संघर्ष, कोर्टबाजी सुरू झाली. आमच्यात काही मुद्द्यांवर एकमत होत नव्हतं. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्याकडे जावं लागलं. आमचे उमेदवार शेवटच्या दिवसापर्यंत ठरत नव्हते. अशीही कबुली खासदार महाडिक यांनी दिली.

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपला फटका बसणार नाही

"पुणे शिक्षक मतदार संघामध्ये शिवसेनेने पाठिंबा दिलेल्या उमेदवारामुळे आम्हाला फटका बसेल असं वाटत नाही. शिक्षक मतदार संघामध्ये भारतीय जनता पार्टीची वोट बँक राहिली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेना आमच्यासोबत याआधी देखील नव्हती. शिवसेना आमच्यासोबत नसली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या सोबत आहे. आमचे शिक्षक आणि पदवीधरचे उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील यात शंका नाही". असेही खासदार महाडिक म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com