
Mumbai news : राज्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आंदोलन करण्याचा इशारा देत थेट मुंबई नजीक पोहचले आहेत. त्यांच्या अधिवेशनाला मोठ्या प्रमाणात राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदार, खासदार त्यासोबतच केंद्रीय मंत्र्यांनी पाठिंबा दिला असून त्यांची यादीच समोर आली आहे. तर दुसरीकडे आता शुक्रवारी मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनास बसणार आहेत. या आंदोलनामध्ये आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे एकापाठोपाठ एक असे दोन खासदार आंदोलनात थेट सहभागी होणार असल्याने आता उत्सुकता वाढली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून रस्त्यावर उतरून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणावरून आंदोलन करीत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे एकदा मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना सगेसोयरे (नातेवाईक) अध्यादेशाच्या अंमलबजावणीचा अध्यादेश लागू करताना अडचणी आल्या होत्या. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा रखडला होता. त्यानंतर आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईची वाट धरली आहे. 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत गणपतीची आरती करुन जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात मोर्चासाठी रवाना झाले आहेत.
शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे परभणीतील खासदार संजय बंडू जाधव यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केली होती. त्यानंतर हिंगोलीतील खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांनी जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवत आंदोलनात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
गेल्या दोन दिवसापासून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे. चार सत्ताधारी आमदारांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, त्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित, आमदार राजू नवघरे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विलास भुमरे या आमदारांचा समावेश आहे. तर विरोधी पक्षातील चार खासदार आणि दोन आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्षातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
विरोधी पक्षातील शिवसेना ठाकरे गटाचे परभणीतील खासदार संजय बंडू जाधव यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केली होती. आता, आणखी एका हिंगोलीतील खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवत आंदोलनात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या आंदोलनामध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे सुद्धा सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी परभणीचे खासदार बंडू जाधव यांनीही आपली भूमिका जाहीर करत जरांगे पाटलांच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले होते.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचा पाठिंबा आहे. तर, महायुतीमधील रिपाइं आठवले गटाचे प्रमुख मंत्री रामदास आठवले यानीही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, मराठा आरक्षणास आपला पाठिंबा असून आंदोलनातील प्रमुख मागणी असलेल्या ओबीसीतून आरक्षणास आपला पाठिंबा नसल्याचे त्यांनी जाहीर केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.