Mantralaya Canteen Row: '79 त्रुटी सापडल्या, मग क्लिन चीट कशी?' मंत्रालयातील कॅन्टीनवर संजय गायकवाडांचा थेट सवाल

Sanjay Gaikwad Questions FDA Clean Chit: मंत्रालयातील कॅन्टीनला क्लिन चीट कशी मिळाली, असा सवाल आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित केला. राज्यभरातील शासकीय व खासगी कॅन्टीनची नियमित तपासणी करण्याची मागणी.
Sanjay Gaikwad Questions FDA Clean Chit:
Sanjay Gaikwad Questions FDA Clean ChitSarkarnama
Published on
Updated on

बुलढाणा: मुंबई उच्च न्यायालयाने मंत्रालयातील कॅन्टीनच्या स्वच्छतेवरून आणि एफडीएच्या '९८% स्वच्छतेच्या' दाव्यावरून जोरदार कानउघाडणी केली होती. "फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये माशी किंवा झुरळ आढळतात, मग मंत्रालयाचे कॅन्टीन इतके निर्दोष कसे?" असा खोचक सवाल करत न्यायालयाने एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हायकोर्टाच्या आदेशाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना आधीच होती, त्यामुळे कारवाईपूर्वीच कॅन्टीन साफसफाईची संधी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तपासणीत 79 त्रुटी आढळूनही अवघ्या दोन महिन्यांत कॅन्टीनला क्लीनशीट कशी मिळाली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मंत्रालयातील कॅन्टीनमध्ये कॉकरोच, उंदीर, पाल आणि केस आढळल्याच्या तक्रारी आमदारांनी केल्याचा दावा करत, हीच अवस्था राज्याच्या सर्वोच्च प्रशासकीय ठिकाणी असेल तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर बाजारातून निकृष्ट पनीर, तूप आणि बनावट दुग्धजन्य पदार्थ गायब झाल्याचे सांगत, राज्यभरातील सर्व शासकीय व खासगी कॅन्टीनची नियमित तपासणी करून दर पंधरा दिवसांनी आढावा घ्यावा, अशी मागणी संजय गायकवाड यांनी केली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या कडक ताशेऱ्यांनंतर आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) धडक कारवाईमुळे मंत्रालयातील उपाहारगृहात अवघ्या काही तासांत मोठा बदल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कालपर्यंत अस्वच्छता, निकृष्ट स्वच्छताव्यवस्था आणि नियमांच्या उल्लंघनामुळे चर्चेत असलेले कँटीन आज मात्र पूर्णपणे बदललेल्या स्वरूपात दिसून आले.

Sanjay Gaikwad Questions FDA Clean Chit:
Maval News: 'धरणासाठी जमीन दिली, पण शेवटच्या प्रवासासाठीही आम्हाला जागा नाही!' मावळातील 23 गावांचा आक्रोश

उपाहारगृहातील कर्मचाऱ्यांच्या हातात हँडग्लोव्हज, डोक्यावर हेअर कॅप्स, तर खाद्यपदार्थांवर नवीन संरक्षक जाळ्या लावण्यात आल्या होत्या. स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळले जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

आज सकाळी उच्च न्यायालयातील सुनावणीनंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह वकिलांच्या पथकाने मंत्रालयातील उपाहारगृहाची प्रत्यक्ष पाहणी केली. न्यायालयाच्या ताशेऱ्यांनंतर प्रशासनाने तातडीने सुधारणा केल्याचे या बदलांवरून स्पष्ट होत असल्याची चर्चा मंत्रालय परिसरात रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com