Parbhani News : राज्यभरात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीने एकहाती विजय मिळवत वरचष्मा असल्याचे दाखवून दिले. या निवडणुकीत भाजपचे 288 पैकी 130 तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 60 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 45 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यातच आता परभणी जिल्ह्यातील मानवत नगरपालिकेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकावला आहे. याठिकाणी इतिहासात प्रथमच नागरिकांनी शहराच्या सत्तेची चावी पती-पत्नीच्या हातात दिली आहे. शहरवासीयांनी अजितदादांचे शिलेदार असलेल्या लाड दांपत्याच्या हाती कारभार सोपवला आहे.
महिनाभरापूर्वी पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत मोठी चुरस पाहावयास मिळाली. मानवत नगर परिषदेच्या निवणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) पक्षाच्या राणी अंकुश लाड या नगराध्यक्ष म्हणून मोठ्या मताने विजय झाल्या होत्या. त्यांनतर आता उपनगराध्यक्ष म्हणून त्यांचे पती अंकुश लाड यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे हे दांपत्य मानवत नगर परिषदेचे कारभारी ठरले आहे.
मानवत नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजप अशी थेट लढत झाली होती. या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या राणी लाड विजयी झाल्या होत्या. त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे 16 सदस्य विजयी झाले होते.
मानवत नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 16, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे चार तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एक आणि भाजपचा एक सदस्य विजयी झाला होता. या निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एक हाती विजय मिळवला होता. त्यामुळे मानवत नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाच्या नेत्याची वर्णी लागणार हे निश्चित झाले होते.
परभणी जिल्ह्यातील पहिलीच वेळ
नुकत्याच पार पडलेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मानवत येथील नेते डॉ. अंकुश लाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ज्यामुळे आता मानवत नगर परिषदेत पत्नी राणी लाड या नगराध्यक्ष तर त्यांचे पती डॉ. अंकुश लाड हे उपनगराध्यक्ष असे मिळून कारभारी असणार आहेत. पती-पत्नी हे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून निवड होण्याची ही परभणी जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.