Jaykumar Gore Reply to Shivsena : शिवसेनेला पालकमंत्र्यांचं खणखणीत उत्तर; म्हणाले ‘आपली क्षमता अन्‌ पात्रता बघून...’

Solapur Corporation Election 2026 : सोलापूर महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी युतीसमोर भाजपचे आव्हान उभे असून अमोल शिंदेंच्या थेट आव्हानानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार पलटवार केला आहे.
Amol Shinde-Jaykumar Gore
Amol Shinde-Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 11 January : सोलापूर महापालिका निवडणुकीत महायुतीमधील शिवसेना-भाजप हे दोन पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. महापालिकेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली असून त्यांच्यासमोर भाजपचे आव्हान आहे. शिवसेना आणि भाजप नेत्यांकडून एकमेकांवर टोकाची टीका केली जात आहे. त्यातच आज शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी थेट आमदार देवेंद्र कोठे यांना ‘यापुढच्या काळात तुझी आणि माझी गाठ ‘शहर मध्य’ मतदारसंघात शंभर टक्के आहे. तु फक्त तुझी काळजी कर,’ असे चॅलेंज दिले. त्याला पालकमंत्री जयकुमार गोरेंनी उत्तर देताना आपली क्षमता आणि पात्रता बघून बोललं पाहिजे, असा पलटवार केला आहे.

सोलापूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात रविवारी (ता. ११ जानेवारी) पदयात्रा, कोपरा सभा आणि रॅली याद्वारे उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधला. एका रॅलीदरम्यान बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे (Amol Shinde) यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर हल्लाबोल केला. त्याला थेट पालकमंत्र्यांनी उत्तर दिल्याने शिवसेना आणि भाजपमधील वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) म्हणाले, सोलापूर महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि जनता प्रचंड उत्साहीत आहे. भाजपला जनता खूप मोठं बहुमत देणार आहे, असे सोलापूर शहरातील वातावरण आहे. प्रभाग क्रमांक सातमध्ये तुम्ही उत्साह बघता आहात. येथील जनतेने भारतीय जनता पक्षाच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Amol Shinde-Jaykumar Gore
Shivsena VS BJP : शिवसेना जिल्हाप्रमुखाचे भाजप आमदाराला ओपन चॅलेंज; ‘सगळ्या तालमी आमच्यासाठी खमक्या; आता तू फक्त तुझी काळजी कर...’

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना दिलेल्या चॅलेंजबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, अशा पद्धतीचं वक्तव्य करणं चुकीचं आहे. आपली क्षमता, आपली पात्रता बघून आपण बोललं पाहिजे. प्रत्येकी दादागिरी आणि ॲरोगन्स पद्धतीने बोलून फार काही साध्य करता येत नाही.

Amol Shinde-Jaykumar Gore
Gopichand Padalkar : पडळकरांनी पवारांना पुन्हा डिवचले; मी 10 वर्षे तुमच्या नादाला लागलोय, तुम्ही माझं काय केलंय; ते लांडगेंचं करणार आहात?

कोणतीही निवडणूक ही सौजन्याने लढायची असते अणि ती सौजन्याने लढली पाहिजे. कोण कोणाचा कायमचा शत्रू किंवा दुश्मन नसतो. ही लढाई सोलापूरच्या विकासाची आहे, हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. माझी लढाई ही देवेंद्र कोठेंसोबत आहे की जनतेच्या विकासासाठी आहे, हे समजलं पाहिजे, असा टोला पालकमंत्री गोरे यांनी जिल्हाप्रमुख शिंदे यांना लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com