Maratha Reservation : 'मनात आलं म्हणजे अधिवेशन घेता येत नाही', जरांगे पाटलांच्या उपोषणावर उदय सामंतांचे उत्तर...

Manoj jarange Jarange Patil Hunger Strike : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते, त्याप्रमाणे सीएमओच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून 20 तारखेला अधिवेशन होणार
Uday Samant
Uday Samantsarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे 10 फेब्रुवारीपासून उपोषण करत आहेत. सरकारने काढलेल्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्याची जरांगे पाटील यांची मागणी आहे. आज (गुरुवारी) उपोषणाच्या सहाव्या दिवशी जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना पोटदुखीचा त्रास होतो आहे. जरांगे पाटील यांच्या अधिवेशनाच्या मागणीवर मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे.

Uday Samant
Manoj Jarange Hunger Strike : जस जशी जरांगेंची प्रकृती ढासळतेय, तस तसा मराठ्यांचा रोष वाढतोय...

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते, मी मराठा आरक्षणासाठी अधिवेशन लावेल. त्याप्रमाणे सीएमओच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून 20 तारखेला अधिवेशन होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मनात आलं म्हणजे अधिवेशन घेता येत नाही,' असे उदय सामंत (Uday Samant) म्हणाले.

उद्या अधिवेशन घेणार आहोत, असे म्हणत अधिवेशन घेता येत नाही. मनोज जरांगे (manoj jarange ) यांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. उपोषणानंतर चिडचिड होते. चिडचिडीतून काही भावना व्यक्त केली असेल, तर आम्ही नाराज आहोत असे होत नाही, असेदेखील उदय सामंत यांनी सांगितले.

जरांगेंच्या जिवाशी खेळ

शिवसेना (ठाकरे) खासदार विनायक राऊत यांनी मनोज जरांगेंच्या उपोषणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले आहे. मनोज जरांगे यांच्या जिवाशी खेळण्याचे क्रूर कृत्य एकनाथ शिंदे करत आहेत. शिंदे यांनी जरांगे पाटील यांना फसवलं आणि आता स्वतःचा टेंभा मिरवत आहेत, असा टोला राऊत यांना लगावला.

उपचारास नकार

मनोज जरांगे-पाटील यांच्या बेमुदत उपोषणामुळे प्रकृती खालावली आहे. ते पोटदुखीने व्याकूळ झाले आहेत. मात्र, डाॅक्टरांकडून उपचार घेण्यास त्यांनी नकार दिला. जरांगे यांची प्रकृती खालावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उपोषणस्थळी मराठा बांधव गर्दी करत आहेत.

R

Uday Samant
Ashok Chavan News : 'फिर भी दिल है काँग्रेसी', अशोक चव्हाण यांच्या ट्विटरवर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com