Chhagan Bhujbal on Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाची मागणी सुरु असतानाच ओबीसी व मराठा नेत्यांमध्ये आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. त्यामुळे मराठा समाज आणि मनोज जरांगेच्या निशाण्यावर भुजबळ आहेत.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या चार सदस्यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आनंद निरगुडे हेही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्यावर भुजबळांनी भाष्य करीत मराठा समाजावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते माध्यमाशी बोलत होते.
"मागासवर्गीय आयोग आता राहिला नाही, तो आता मराठा आयोग झाला आहे. सगळेच मराठा कुणबी होत असल्याने महाराष्ट्रात आता मराठा शिल्लक राहणार नाहीत," अशा शब्दात भुजबळांनी नाराजी व्यक्ती केली आहे.
"माझ्यावर टीका केली नाही तर त्यांचे भाषण कोण ऐकणार," असा टोला भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांचे नाव न घेता लगावला आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामात राज्य सरकारकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप होत आहे.अमूक एका माहितीचाच आग्रह सरकारकडून केला जात आहे. मात्र, आयोग स्वायत्त असून सर्व्हेक्षणातून पुढे आलेली माहितीच आम्ही सरकारला देऊ शकतो. पण याशिवाय माहिती द्यावी, असे सांगितले जात असेल तर काम करणे अवघड आहे, असेही आयोगाचे सदस्यांचे म्हणणे आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजात दोन मंत्री आणि एका न्यायमूर्तीचा हस्तक्षेप असल्याची तक्रार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.