Abdul Sattar News : सत्तारांच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलचे दिलखेचक नृत्य अन् इंदुरीकरांचे कीर्तनही...

Marathwada Political News : वाद आणि सत्तार यांचाही गेल्या वर्षभरात पाठशिवणीचा खेळ सुरू होता.
Abdul Sattar News
Abdul Sattar NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : शिवसेना शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांचा काल (ता. 1) वाढदिवस साजरा झाला. यानिमित्ताने सिल्लोड या त्यांच्या मतदारसंघात समर्थकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावही केला. (Abdul Sattar News) मतदारसंघ, समर्थक आणि आपल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसाठी कायम तत्पर असणाऱ्या सत्तार यांनी वाढदिवसानिमित्त जंगी सेलिब्रेशन आणि मनोरंजनाचीही जोरदार तयारी केली. दरवर्षीप्रमाणे सिल्लोड महोत्सवाचे आयोजन, सांस्कृतिक मनोरंजनाची सोय केली.

Abdul Sattar News
Abdul Sattar: बेधडक वक्तव्यं, वादग्रस्त... तरीही लोकप्रिय...अब्दुल सत्तार

आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवात गौतमी पाटीलच्या दिलखेचक अदा, लावणी, डान्स, आनंद शिंदे यांची गाणी, कव्वालीचा मुकाबला ते इंदुरीकर महाराजांचे कीर्तन अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. (Shivsena) जंगी कुस्त्या, शंकरपट, क्रिकेट स्पर्धा, आनंदनगरी आणि यांसह अनेक सामाजिक उपक्रमही घेण्यात येणार आहेत.

गेल्यावर्षी अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे कृषिमंत्री असल्यामुळे `कृषी आणि सिल्लोड महोत्सव` अशी सांगड घालत त्यांनी मतदारसंघातील जनतेला आठवडाभर शेती तंत्रज्ञान आणि मनोरंजन अशी दुहेरी मेजवानी दिली होती. (Marathwada) अर्थात कृषी महोत्सवाच्यानिमित्ताने तेव्हा मोठा वादही निर्माण झाला होता. पण सत्तार अशा वादाची फारशी पर्वा करीत नाहीत. शिंदे सरकारमध्ये मदारसंघासाठी सर्वाधिक निधी, योजना आणि प्रकल्प खेचून आणल्यामुळे सत्तार यांची राज्यभरात चर्चा झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वाद आणि सत्तार यांचाही गेल्या वर्षभरात पाठशिवणीचा खेळ सुरू होता. पण या सगळ्यावर मात करीत सत्तार यांनी मतदारसंघात जास्तीत जास्त निधी आणि योजना कशा आणता येतील, यासाठी आपली शक्ती पणाला लावली. सिल्लोड एमआयडीसी, मका संशोधन केंद्र, सूतगिरणीचा प्रकल्प, सिंचनाच्या योजना, छत्रपती शिवाजीमहाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने `भीम `पार्क अशा अनेक प्रकल्पांना मंजुरी आणि निधीही त्यांनी आणला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून सत्तार यांची ओळख आहे. शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची एन्ट्री झाली तेव्हा सत्तार यांचे कृषिमंत्रिपद त्यांच्याकडून गेले. अल्पसंख्याक विकास, पणन व वक्फ खात्याचा कारभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला.

Abdul Sattar News
Miraj Shivsena : शिवसेना कार्यालय जागेच्या मालकी हक्कावरून मिरजेत दोन्ही गटांचे शिवसैनिक भिडले!

तेव्हापासून सत्तार हे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्तार यांची जालना आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात महत्त्वाची भूमिका असणार आहे. या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त सत्तार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनाचा घाट `सिल्लोड महोत्सवानिमित्ताने घातल्याची चर्चाही होत आहे.

Edited By : Jagdish Pansare

Abdul Sattar News
Shivsena News : शिरसाट-भुमरे `अ‍ॅक्शन` मोडवर ; ठाकरे गटावर चढवतायेत जोरदार हल्ला..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com