Abdul Sattar News : अब्दुल सत्तार म्हणतात, नाराज नाही, पण अडीच वर्षांनी 'मी पुन्हा येईन',..

Abdul Sattar says, I will come again- Not upset about not getting ministerial post : मतदारांनी ज्या विश्वासावर चौथ्यांदा निवडून दिले त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जावू देणार नाही, अशी ग्वाही अब्दुल सत्तार यांनी या आभार मेळाव्यातून दिली.
EX Minister Abdul Sattar News
EX Minister Abdul Sattar NewsSarkarnama
Published on
Updated on

सिल्लोड : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिल्लोड सोयगाव मतदारसंघातून अब्दुल सत्तार (Abdul Sattar) अवघ्या 2420 मतांनी निवडून आले. काठावर पास झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात त्यांना डावलण्यात आले. तरी अब्दुल सत्तार गप्प राहिले, मात्र आज मतदारसंघात घेतलेल्या आभार मेळाव्यात ते बोलले. विशेष म्हणजे अगदी संयमाची भूमिका घेत त्यांनी मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज नसल्याचे स्पष्ट केले. तसेच अडीच वर्षांनी 'मी पुन्हा येईन' म्हणत आपला मंत्रीपदावरचा दावा कायम असल्याचे सूचित केले.

विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी कितीही जातीवादाचा प्रचार केला असला तरी मतदारांचा भक्कम पाठिंबा आणि कार्यकर्त्यांच्या बळावर आपण चौथ्यांदा विजयी झालो. (Shivsena) मतदारांनी ज्या विश्वासावर चौथ्यांदा निवडून दिले त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जावू देणार नाही, अशी ग्वाही अब्दुल सत्तार यांनी या आभार मेळाव्यातून दिली.

EX Minister Abdul Sattar News
Shivsena UBT : मुंबई केंद्रशासित करा! काँग्रेस आमदाराने विधानसभेत तोडले अकलेचे तारे, ठाकरेंची शिवसेना कडाडली

नेहमीच्याच आत्मविश्वासाने सर्वसामान्य जनतेची सेवा व मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहू असा विश्वास सत्तार यांनी आपल्या भाषणातून दिला. राज्यातील सरकार आपले आहे, या सरकारमधील मंत्री आपल्या विचाराचे आहेत. त्यामुळे मतदारसंघाला निधी कमी पडणार नाही. अनेक विकास कामे येत्या काळात करायची आहे. मंजूर तसेच प्रगती पथावर असलेली विकास कामे पूर्ण करायची आहेत.

EX Minister Abdul Sattar News
Abdul Sattar News : 'मगर हम चुप रहेंगे', मंत्रीमंडळातून डावलल्यानंतरही अब्दुल सत्तार गप्पच!

जिल्ह्यात सर्वाधिक मते आपल्याला मिळाली, त्यामुळे कार्यकर्त्यांनी सकारात्मक दृष्टीकोन समोर ठेवून लोकांची सेवा करावी, असे आवाहन सत्तार यांनी केले. राजकारणात आत्मचिंतन करणे गरजेचे आहे, ज्या गावात आपल्याला मताधिक्य मिळाले, पण त्याच पद्धतीने ज्या गावात आपल्याला कमी मत मिळाले त्याचा देखील शोध घेणे गरजेचे आहे.

EX Minister Abdul Sattar News
Sillod Assembly Election : निवडून आल्यानंतरही सत्तारांची साडेसाती संपेना; सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल

तहान लागली तेव्हा विहीर खोदायची असे चालणार नाही. त्यामुळे पुढील दिशा ठरविण्यासाठी नियोजन करा, येथून पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी युवकांची मजबूत फळी निर्माण करा. पक्ष संघटनेवर भर द्या, असे आवाहन सत्तार यांनी केले. सिल्लोडला मंत्रीपद मिळेल अशी सर्वांची अपेक्षा होती.

EX Minister Abdul Sattar News
Mahayuti Government : धक्कातंत्र अंगलट; प्रचंड बहुमत, तरीही महायुती सरकार घामाघूम

मात्र राज्यातील विविध समतोल साधत असताना तसेच पक्षाने अडीच वर्षाचा फार्मूला ठरवला, त्यामुळे आपल्याला मंत्रिपदापासून वंचित राहावे लागले. पण कार्यकर्त्यांनी नाराज राहू नये, अनेकांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. किती मंत्री असावे याची मर्यादा आहे, सरकार आपले असून सर्व मंत्री आपल्या विचाराचे असल्याचा पुनरुच्चार सत्तार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com