Abdul Sattar News : 'मगर हम चुप रहेंगे', मंत्रीमंडळातून डावलल्यानंतरही अब्दुल सत्तार गप्पच!

Former Minister Abdul Sattar remains silent : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात सत्तार नाहीत. सत्तार यांचे मंत्रिपद हुकल्यामुळे त्यांच्या मतदारसंघात समर्थकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
Shivsena Political News
Shivsena Political NewsSarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या मंत्रिमंडळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तीनही पक्षातील काही इच्छुक अन् माजी मंत्र्यांची वर्णी न लागल्यामुळे गरमागरमी सुरू आहे. भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे. तर याच पक्षाचे आमदार कुटे यांनीही आपण नाराज नाही मात्र कार्यकर्ते नाराज असल्याचे सांगत भावनिक पोस्ट टाकली.

इकडे राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्यामुळे त्यांनी रान पेटवले आहे. तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे माजी मंत्री विजय शिवतारे, तानाजी सावंत हे आगपाखड करताना दिसत आहेत. या सगळ्या नाराजी नाट्यात शिवसेनेचे माजी मंत्री (Abdul Sattar) अब्दुल सत्तार मात्र शांत आहेत. डावल्ल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार होऊन तीन दिवस उलटून गेले तरी अब्दुल सत्तार यांनी कुठल्याही प्रकारची नाराजी व्यक्त केली नाही की सोशल मीडियावर पोस्ट टाकली? प्रसार माध्यमांनाही ते टाळताना दिसत आहेत.

Shivsena Political News
Abdul Sattar News : जुनी प्रकरणं नव्याने समोर ; अब्दुल सत्तारांचा पाय खोलात!

अब्दुल सत्तार यांचे आतापर्यंतचे राजकारण आणि त्यांचा आक्रमक स्वभाव पाहता त्यांच्या या शांततेचे वेगळे अर्थ काढले जात आहेत. अब्दुल सत्तार यांचा राजकीय प्रवास काँग्रेस, शिवसेना आणि आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून सुरू आहे. काँग्रेस आणि दोन्ही शिवसेना या पक्षाकडून सत्तार यांना मंत्रिपदाची संधी मिळाली होती. राज्यात सरकार कोणाचेही असो त्या मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार कायम दिसायचे.

Shivsena Political News
Shivsena : तानाजी सावंत, दीपक केसरकरांना तब्बल पाच तास वेटींग, एकनाथ शिंदेंनी भेट नाकारली?

2024 च्या विधानसभा निवडणुकीत सिल्लोड- सोयगाव मतदार संघातून काठावर पास झाल्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात सत्तार नाहीत. सत्तार यांचे मंत्रिपद हुकल्यामुळे त्यांच्या मतदारसंघात समर्थकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. मात्र ती कुठल्याही परिस्थितीत व्यक्त करायची नाही, अशा सूचनाच अब्दुल सत्तार यांनी समर्थक आणि कार्यकर्त्यांना दिल्याचे बोलले जाते.

Shivsena Political News
Ajit Pawar-Eknath Shinde : दोन्ही उपमुख्यमंत्री अधिवेशनातून गायब! खातेवाटपाचं घोडं अडल्याने चर्चांना उधाण

अब्दुल सत्तार यांची उपद्रव शक्ती पाहता ते भविष्यात वेगळा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. तूर्तास मात्र सत्तार यांनी 'हम चुप रहेंगे' अशी भूमिका घेतल्याचे दिसते. त्यांच्या या शांत राहण्यामुळे त्यांच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे? याचा अंदाज त्यांच्या समर्थकांनाही येत नाहीये. सत्तार यांचीही शांतता येणाऱ्या काळातील वादळापूर्वीची शांतता ठरणार का? सत्तार आपल्याला डावलल्याचा सूड महायुती सरकारवर उगवणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com