Abdul Sattar News : मंत्रीपद नसले तरी अब्दुल सत्तार 'शक्ती' दाखवणार!

Abdul Sattar will show his strength on his birthday : सत्तार यांना मंत्रीपद मिळाले असते तरी असेच स्वागत त्यांचे करता आले असते, पण ही संधी त्यांच्या समर्थकांना मिळाली नाही. मात्र आता मंत्री संजय शिरसाट यांच्यापेक्षाही मोठे आणि भव्य स्वागत करण्याची तयारी सत्तार समर्थकांनी चालवली आहे.
Abdul Sattar
Abdul SattarSarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : आधी महाविकास आघाडी अन् नंतर महायुती सरकारमध्ये पाच वर्ष मंत्री राहिलेल्या अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये डावलण्यात आले. त्यांच्याऐवजी संजय शिरसाट यांना मंत्रीपद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झुकते माप दिले. मंत्रीपद न मिळाल्याने सत्तार नाराज असले तरी ते उघडपणे ती दाखवत नाहीयेत. नुकताच त्यांना मतदारसंघात आभार मेळावा घेतला आणि 'अडीच वर्षांनी मी पुन्हा येईन', म्हणत मंत्रीपदाची आशा असल्याचे सांगितले.

सरकारमध्ये आपले वेगळे वजन आणि अस्तित्व राखणाऱ्या अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद न मिळाल्याची सल आहे. यापेक्षा त्यांच्या समर्थकांना आपले साहेब आता मंत्री नाहीत हे बघवत नाहीये. दुसरीकडे मंत्रीपद आणि सामाजिक न्याय खाते मिळालेल्या (Sanjay Shirsat) संजय शिरसाट यांचे छत्रपती संभाजीनगरात काल भव्यदिव्य असे स्वागत झाले. चार तास मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी, जेसीबीतून फुलांची उधळण असा सगळा झगमगाट पाहून अनेकांचे डोळे दिपले.

Abdul Sattar
Abdul Sattar News : अब्दुल सत्तार म्हणतात, नाराज नाही, पण अडीच वर्षांनी 'मी पुन्हा येईन',..

सत्तार यांना मंत्रीपद मिळाले असते तरी असेच स्वागत त्यांचे करता आले असते, पण ही संधी त्यांच्या समर्थकांना मिळाली नाही. मात्र आता मंत्री संजय शिरसाट यांच्यापेक्षाही मोठे आणि भव्य स्वागत करण्याची तयारी सत्तार समर्थकांनी चालवली आहे. निमित्त आहे अब्दुल सत्तार यांचा 1 जानेवारी रोजीचा वाढदिवस. मंत्रीपदाच्या काळात सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात आठवडाभर विविध उपक्रम राबवले जातात.

Abdul Sattar
Sanjay Shirsat : मंत्री होताच संजय शिरसाट हिशोब चुकता करणार! सत्तारांवर सोडला बाण..

सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा अशा अनेक उपक्रमांच्या रेलचेलीतून सत्तार दरवर्षी मोठे शक्ती प्रदर्शन करत असतात. मंत्रीपद गेल्यानंतर येत्या 1 जानेवारीला त्यांचा वाढदिवस साजरा होणार आहे. यावेळी मंत्रीपद मिळाले नसले तरी या माध्यमातून अब्दुल सत्तार 'शक्ती' दाखवणार आहेत. यासाठी सत्तार यांच्या सर्व पक्षातील समर्थकांची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अब्दुल सत्तार यांनी अनेकांना सत्ता, पदे दिली, मोठे केले. त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळायला हवे होते. सत्तार जो निर्णय घेतील आम्ही त्यासोबत कायम राहू, अशी ग्वाही देखील या बैठकीच्या निमित्ताने देण्यात आली.

Abdul Sattar
Shivsena News: आदित्य ठाकरेंमुळे भाजप-सेना युती तुटली, शिंदे सेनेच्या प्रवक्त्याचा थेट आरोप

सत्तार यांच्याकडे मंत्रीपद नसले तरी लोकांचा त्यांना भरपूर पाठिंबा आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांचे समर्थक 1 जानेवारी रोजीच्या वाढदिवसातून दाखवणार आहेत. तब्बल एक लाख समर्थकांच्या उपस्थितीत सत्तार यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. यासाठी शहरातील सर्वच मोठ्या मैदानांची पाहणी करण्यात आली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांचा येणारा वाढदिवस दरवर्षी पेक्षा वेगळा आणि शक्तीप्रदर्शनात करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com