Abhijeet Dipke: कॉकरोच पार्टीचा संस्थापक अभिजीत दिपके उद्या भारतात येणार; तत्पूर्वीच त्याच्या कुटंबानं सोडलं घर

Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीच्यावतीनं उद्या दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर परीक्षांमधील घोटाळ्यांविरोधात जनआंदोलन करण्यात येणार आहे, या आंदोलनासाठी अभिजीत दिपके भारतात येणार आहे.
Abhijeet Dipke
Abhijeet Dipke
Published on
Updated on

Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीच्यावतीनं उद्या दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर परीक्षांमधील घोटाळ्यांविरोधात जनआंदोलन करण्यात येणार आहे, या आंदोलनासाठी अभिजीत दिपके भारतात येणार आहे. पण तत्पूर्वीच छत्रपती संभाजीनगर इथं राहणाऱ्या त्याच्या आई-वडिलांनी घरं सोडलं आहे. त्याच्या घरात कोणीही नसताना पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पण नेमकं काय घडलंय? ज्यामुळं त्याच्या कुटुंबाला दुसरीकडे जावं लागलं जाणून घेऊयात.

Abhijeet Dipke
Congress Action : चुकीला माफी नाही! काँग्रेसमधून दोघांचे निलंबन, उमेदवारी घेतली अन्..., 'ती' चूक महागात पडली!

अमेरिकेतील बोस्टनमध्ये राहणारा आणि कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दिपके 6 जूनला भारतात येणार असून दिल्लीतील जंतर-मंतरवर शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आंदोलन करणार आहे. नुकत्याच झालेल्या नीट पेपर लीक, त्यामुळं विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या, सीबीएसईच्या पेपर तपासणीतील अनागोंदीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची यावेळी करण्यात येणार आहे. यासाठी नियोजनबद्ध पद्धतीनं जनआंदोलन उभारण्यात येत आहे. कॉकरोच पार्टीच्यावतीनं काही तरुणांची प्रवक्तेपदी नियुक्ती देखील करण्यात आली आहे. त्यांच्या मार्फत या पार्टीचा अजेंडा देखील माध्यमांच्या माध्यमातून जनतेसमोर मांडला जात आहे.

Abhijeet Dipke
MLC Election : "मोहिते पाटलांनी केसाने गळा कापला... फसवणूक केली" : मुलाला डावलताच उत्तमराव जानकरांचे गंभीर आरोप

दरम्यान, दिपके अमेरिकेतून थेट दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार असल्यानं त्याचे समर्थक त्याचं विमानतळावर स्वागत करणार आहेत. पण अभिजीत दिपकेनं सत्ताधाऱ्यांना आपला निशाणा बनवलं आहे. त्यामुळं काही तरुणांनी त्याला उघडपणे जीवेमारण्याची धमकीही दिली होती. या धमकी देणाऱ्यानं व्हिडिओद्वारे स्वतःची ओळख सांगत धमकी दिली होती, पण पोलिसांनी या व्यक्तीवर अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही. पण आता अभिजीत दिपके भारतात परतणार असल्यानं त्याच्या सुरक्षेसाठी दिल्ली विमानतळासह संभाजीनरमधील त्याच्या घराभोवतीही कडेकोड सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

Abhijeet Dipke
Nashik MLC Election : मंत्री उदय सामंतांनी दुसऱ्यांदा लावला जोर; दराडेंना बिनशर्त पाठिंबा देण्याची गोकुळ गितेंना विनंती

या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव छत्रपती संभाजीनगरातील त्याच्या कुटुंबाने घर सोडल्याची माहिती आहे. त्याच्या कुटुंबियांचं वाळुज एमआयडीसी परिसरातील घर सध्या बंद असून पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. अभिजीत दिपकेचे आई-वडील सध्या बाहेरगावी आहेत. 10 जूननंतर ते आपल्या घरी परतणार आहेत, अशी माहिती खात्रीलायक सुत्रांच्यावतीनं देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com