Raosaheb Danve News : 25 वर्षांपूर्वीच्या आंदोलनातील कार्यकर्ते भेटले अन् दानवेंना आली गोपीनाथ मुंडेंची आठवण...

Loksabha Election 2024 : रावसाहेब दानवे यांनी सोमवारी (ता.29) जालना लोकसभा मतदारसंघातील शेवटचे गाव असलेल्या जरांडीमध्ये प्रचारानिमित्त मतदारांच्या भेटी घेतल्या.
Raosaheb Danve News
Raosaheb Danve NewsSarkarnama

Jalna News : गावचे सरपंच ते केंद्रात रेल्वे खात्याचे राज्यमंत्री असलेले रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत. एका निवडणुकीत विजय झाला की आम्ही दुसऱ्या दिवशीपासून पुढच्या निवडणुकीची तयारी करतो, असं दानवे अभिमानाने सांगतात. दोनवेळा आमदार, पाच वेळा खासदार, दोनदा केंद्रात मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष हा त्याचा राजकीय प्रवास पाहिला की ते असं का सांगतात हे लक्षात येते.

रावसाहेब दानवे यांनी सोमवारी (ता.29) जालना लोकसभा मतदारसंघातील शेवटचे गाव असलेल्या जरांडीमध्ये प्रचारानिमित्त मतदारांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी पंचवीस वर्षांपूर्वी मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वी बीड जिल्ह्यातील गढी ते सोयगांव तालुक्यातील जरंडी दरम्यान काढलेल्या कापूस दिंडी आणि संघर्ष यात्रेची आठवण झाली. शेतकऱ्यांचा कापूस सरकारने खरेदी करावा, यासाठी झालेल्या या आंदोलनातील तेव्हाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी दानवेंना भेटले आणि त्यांनी त्यांची गळाभेट घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Raosaheb Danve News
Sanjay Shirsat On Sharad Pawar : संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप; म्हणाले, भाजपसोबत जाण्याचा शरद पवारांचाच प्लॅन

जालना लोकसभा मतदारसंघाची पुनर्ररचना 2009 मध्ये झाली. त्याआधी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात पर्यंतचा भाग या मतदारसंघात यायचा. 25 वर्षांपूर्वी रावसाहेब दानवे यांनी पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या कापूस प्रश्नावर गढी ते सोयगाव तालुक्यातील जरंडी, अशी कापूस दिंडी काढली होती. 250 किलोमीटर लांबीचा बीड ,जालना, तत्कालीन औरंगाबाद असा तीन जिल्ह्यांना जोडणारा जालना लोकसभा मतदार संघ होता.

आता जालना लोकसभेत बीड जिल्हा नसला तरी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील जरंडी हे गाव कायम आहे. 1999 मध्ये लोकसभेवर पहिल्यांदा निवडून गेलेल्या दानवे यांनी कापूस खरेदीच्या प्रश्नावर मोठे आंदोलन उभे केले होते. राज्यात काँग्रेसचे सरकार असताना मोठ्या प्रमाणावर उत्पादन झालेल्या कापसाच्या खरेदीचा प्रश्न गंभीर बनला होता. कापूस खरेदी फेडरेशन कडे असल्याने खाजगी व्यापाऱ्यांना कापूस खरेदीची परवानगी नव्हती. पण सरकारी यंत्रणा कापूस घेण्यात कमी पडत होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचवेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी फेडरेशनकडून खरेदी केला जाणारा कापूस हा शेतकऱ्यांचा नसून तो व्यापाऱ्यांकडून येत असल्याचा आरोप केला होता. जो शेतकरी बैलगाडीने कापूस आणेल त्याचाच खरेदी केला जाईल, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. याचा फटका ट्रॅक्टरने फेडरेशनमध्ये कापूस विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना बसत होता. बहुतांश शेतकरी ट्रॅक्टर, ट्रकने तर अनेक शेतकरी डोक्यावर कापूस खरेदी केंद्रावर आणत होते.

माझा राजकीय प्रवास संघर्षातून सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध लढण्याचा व त्यासाठी मोठे आंदोलन उभारण्याचा निर्णय मी घेतला. तेव्हाच्या माझ्या लोकसभा मतदारसंघातील बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याचे गढी हे पहिले गाव. तर सोयगाव तालुक्यातील जरंडी हे शेवटचे गाव. त्यामुळे गढी ते जरंडी अशी कापूस दिंडी काढण्याचे ठरवले. त्याला संघर्ष यात्रा असे नाव दिले आणि संघर्ष यात्रा निघाली.

Raosaheb Danve News
Shirur Lok Sabha Constituency : आधी कोल्हेंचा प्रचार केला आता आढळराव पाटलांसाठी गुडविल; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे गढी येथून 500 शेतकरी मोटरसायकलवर या दिंडीत सहभागी झाले. गेवराई, अंबड, जालना, भोकरदन, सिल्लोड अशा तालुकातून जवळपास 700 किलोमीटरचा प्रवास करत प्रत्येक कापूस खरेदी केंद्रावर आम्ही जायचो. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत त्यांना शक्य ती मदत करण्याचा आमचा प्रयत्न असायचा. या कापूस दिंडीतून आम्ही सरकारला निर्वाणीची इशारा दिला होता. शेतीसाठी ट्रॅक्टर हे उपयुक्त असे वाहन आहे, अनेक शेतकऱ्यांकडे आता बैलगाडी नसून ते शेती कामासाठी ट्रॅक्टरचा वापर करतात हे आम्ही निदर्शनास आणून देत होतो.

त्यामुळे ट्रॅ्क्टरमधून येणारा कापूस व्यापाऱ्यांचा नाही तर शेतकऱ्यांचाच आहे हे आम्ही सरकारला ठणकावून सांगितले. कापूस शेतकऱ्यांचा असून तो तुम्ही घेतलाच पाहिजे, अशी भूमिका घेऊन आम्ही संघर्ष केला होता. गावातल्या ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा करून सायंकाळी आम्ही प्रत्येक कापूस खरेदी केंद्राजवळ सभा घ्यायचो व आमची दिंडी पुढील गावात निघायची. संपूर्ण आंदोलनादरम्यान जवळपास अडीच हजार मोटरसायकलद्वारे 5000 शेतकरी आमच्या आंदोलनात सहभागी झाले होते.

या दिंडीच्या समारोपाला गोपीनाथ मुंडे आले होते. त्या काळातील आंदोलनातील सहभागी शेतकरी आज भेटले, त्यांना पाहून मला आनंद झाला आणि तो काळ डोळ्यासमोर उभा राहिला, अशी आठवण रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी सांगितली. दादा आम्ही त्या काळात तुमच्या आंदोलनात सहभागी होतो, तेव्हा जरंडीतून आम्ही तुम्हाला मताधिक्य दिले, आता तर तुम्ही मंत्री आहात पुन्हा मताधिक्य मिळवून देऊ, अशी ग्वाही यावेळी शेतकऱ्यांना दानवे यांना दिली.

(Edited By Deepak Kulkarni)

Raosaheb Danve News
Narendra Modi Rally In Pune : 70 वर्षांवरील व्यक्तींना मोफत उपचार! PM मोदींच्या भाषणातील 'हे' आहेत ठळक मुद्दे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com