बांगर यांच्यानंतर खासदार पाटीलही शिंदे गटाच्या वाटेवर ? कार्यालय, बॅंकेवर बंदोबस्त..

सध्या जिल्ह्यात शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा संघर्ष सुरू आहे, अशातच आता हेमंत पाटील हेही शिंदेसोबत जाणार म्हटल्यावर शिवसैनिकांचा संताप अनावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ( Hingoli News)
Mp Hemant Patils Office in Hingoli News
Mp Hemant Patils Office in Hingoli NewsSarkarnama
Published on
Updated on

हिंगोली : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाळीसहून अधिक आमदारांनी बंड केले. ते यशस्वी होऊन शिंदे मुख्यमंत्रीही झाले, आता आमदारांच्या वाटेवरच खासदारही निघाल्याचे चित्र आहे. (Hingoli) १८ पैकी १४ खासदार शिंदे गटासोबत जाणार असल्याचे जोरदार चर्चा असून हे सर्व खासदार मुंबईत आज शिंदे यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे समजते.

खासदारांच्या या बंडात हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) हे देखील सहभागी असल्याच्या चर्चेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Marathwada) हेमंत पाटील हे सध्या नाॅटरिचेबल असून ते जिल्ह्यात नसल्यामुळे त्यांचे समर्थक देखील हवालदिल झाले आहेत.

सध्या जिल्ह्यात शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा संघर्ष सुरू आहे, अशातच आता हेमंत पाटील हेही शिंदेसोबत जाणार म्हटल्यावर शिवसैनिकांचा संताप अनावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खासदार हेमंत पाटील यांच्या हिंगोलीतील संपर्क कार्यालयाबाहेर शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पाटील यांच्या नांदेडमधील गोदावरी बँकेच्या मुख्यालयासमोर देखील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Mp Hemant Patils Office in Hingoli News
'कशाला तुमचे खापर शरद पवारांवर फोडता?' राष्ट्रवादीच्या नेत्याने कदमांना सुनावले...

पोलिसांची व्हॅन आणि १२ कर्मचारी तिथे तैनात करण्यात आले आहेत. खासदार पाटील हे सध्या दिल्लीत असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिल्लीमध्ये खासदारांच्या झालेल्या बैठकीत हेमंत पाटील उपस्थित असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com