Beed politics : कार्यक्रम उद्घाटनाचा पण चर्चा अजित पवारांच्या रणनीतीची, टेकऑफ अन् नाष्टा; बजरंग सोनवणेंना लिफ्ट; टेबलवर सोळंके, चाऊस आणि जगतापही

Ajit Pawar-Bajrang sonvane News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचा दौरा करत विकास कामांचा नारळ फोडला. पण यावेळी चर्चा झाली ती त्यांनी केलेल्या नाष्टासह बजरंग सोनवणेंना दिलेल्या लिफ्टची.
Beed politics; Ajit Pawar
Beed politics; Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. अजित पवारांच्या बीड दौऱ्यादरम्यान हेलिकॉप्टरमधील नाश्ता राजकीय चर्चेचा विषय ठरला.

  2. खासदार आणि आमदारांसोबत झालेल्या या भेटीमुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आले.

  3. या प्रसंगामागे राजकीय संदेश आहे की केवळ योगायोग, यावर चर्चा सुरू आहे.

Beed politics news : दत्ता देशमुख

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्याची पंधरा दिवसांपासून चर्चा आणि प्रशासनाकडून तयारी सुरु होती. मात्र, दौरा दोन दिवस पुढे ढकलत काही कार्यक्रमांसाठी पवार गुरुवारी जिल्ह्यात आले. मात्र, त्यांचे टेकऑफ आणि नाष्टा राजकीय चर्चेचे विषय ठरले. जाताना हेलिकॉप्टमध्ये अजितपवारांसोबत खासदार बजरंग सोनवणे आणि पवारांसोबत आमदार सोळंके, सहाल चाऊस, मोहन जगताप यांनी खेळीमेळीने सोबत नाष्टा केला. त्यामुळे नेमके काय? अशी चर्चा सुरु झालीय.

नुकत्याच पार पडलेल्या नगर पालिका निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप तर आमने - सामने लढलेच. पण, प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही धारुर व माजलगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाकी नऊ आणले. माजलगावमध्ये आमदार सोळंकेंच्या होमपचिवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराने बाजीही मारली.

मात्र, आजच्या पालकमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यावेळी पवारांच्या टेबलवर सोळंके, चाऊस आणि जगतापांनी एकत्र आणि हसतखेळत नाष्टा केला. तर, खासदार बजरंग सोनवणेंनी पवारांच्याच हेलिकॉप्टरमधून लिफ्ट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Beed politics; Ajit Pawar
Beed Politics : बीडमध्ये भाजपला सत्तेत नो एन्ट्री! क्षीरसागर बंधू एकत्र येण्याची हालचाल दिसताच विजयसिंह पंडितांनी डाव साधला...

जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव व अंबाजोगाई, धारुर या नगर पालिकांच्या निवडणुकांत महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस आमने - सामने लढले. तर, बीड, माजलगाव आणि धारुरमध्ये भाजप - राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असे तिरंगी सामने झाले. अंबाजोगाईत राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने साथ दिली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांचे होमटाऊन माजलगावमध्ये त्यांच्या नेतृत्वाखालील नगराध्यक्षाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सहाल चाऊस व मोहन जगताप यांच्या नेतृत्वाखालील उमेदवाराने पराभव केला.

पण, आज बीडला आलेल्या अजित पवारांनी पंडितांच्या शिवछत्र निवासस्थानी नाष्टा केला. या टेबलवर पवारांसोबत पक्षाचे आमदार सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, अंबा कारखान्याचे अध्यक्ष रमेश आडसकर, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी आदी नेत्यांसोबत चाऊस, जगतापही होते.

विशेष म्हणजे सोळंके, चाऊस, जगताप यांनी एकमेकांची चेष्टा मस्करी करत नाष्टा घेतला. त्यानंतर पवार हेलिकॉप्टरने परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर सोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणेही होते. सुरुवातीच्या पवारांच्या विकास कामांच्या कार्यक्रमाला सोनवणेंची हजेरी लोकप्रतिनिधी म्हणून सहाजिकच होती. पण, हेलिकॉप्टर लिफ्टने चर्चांना वाव दिला आहे.

Beed politics; Ajit Pawar
Beed Politics : अजितदादांनी आपला शब्द पाळला, राष्ट्रवादी सत्तेत बसताच बीडला दिलं नववर्षाचं भलं मोठं गिफ्ट

FAQs :

1. अजित पवारांचा बीड दौरा का चर्चेत आला?
हेलिकॉप्टरमधील नाश्ता आणि नेत्यांची उपस्थिती यामुळे.

2. अजित पवारांसोबत कोण नाश्ता करत होते?
खासदार बजरंग सोनवणे आणि काही आमदार उपस्थित होते.

3. हा नाश्ता राजकीय बैठक होती का?
अधिकृत माहिती नसली तरी राजकीय चर्चा सुरू आहेत.

4. या घटनेवर अजित पवारांची प्रतिक्रिया काय?
यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

5. याचा आगामी राजकारणावर परिणाम होईल का?
राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू असले तरी ठोस निष्कर्ष नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com