Beed Women Assault : बीड हादरलं! विवाहितेवर अत्याचार अन् चावडीवर लटकवले.., रुपाली चाकणकरांकडून गंभीर दखल; ग्रामसेवक निलंबीत

Women Assault Case Rupali Chakankar : हिवरा पहाडी येथील विवाहित महिलेवर अत्याचार करत तिला चावडीवर डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल महिला आयोगाने घेतली आहे.
Beed crime news
Beed crime newsSarkarnama
Published on
Updated on

Beed News : बीड जिल्ह्यातील हिवरा पहाडी येथील विवाहित महिलेला रात्री घरी झोपलेली असताना घरातून उचलून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून रात्रभर गावच्या चावडीवर बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही महिला अल्पवयीन असल्याचे उघड झाले आहे.

या घटनेची गंभीर दखळ राज्य महिला आयोगाने घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी प्रकरणाचे तपास अधिकारी अतुलकुमार लांडगे यांना दूरध्वनीवरून सूचना दिल्या आहेत.

सद्यस्थितीत पीडित महिलेच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 137(2),333,64(2)(i) आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी वैभव पटेकर याला अटक करण्यात आली आहे.

Beed crime news
भाजप पदाधिकाऱ्यांनाही आता 'KRA' , द्यावा लागतोय दैनंदिन कामांचा लेखाजोखा

पीडित मुलीचा बालविवाहाच्या दृष्टीनेही गुन्हा दाखल करून लग्न लावून देणारे, लग्नास उपस्थित असणारे, पोलीस पाटील, ग्रामसेवक अशा संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे तसेच या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाच्या अध्यक्षा अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

Beed crime news
Assembly Elections : मोठी बातमी : देशातील 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; कोणत्या राज्यात कधी मतदान अन् निकाल? वाचा सविस्तर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com