Beed Political News : महायुतीमध्ये पक्षांची संख्या वाढत आहे. अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) देखील महायुतीत सहभागी झाला. आता महायुतीतील पक्षांचे जिल्हास्तरांवर संमेलने होणार आहेत.
बीडच्या महायुतीच्या पक्षांच्या संमेलनाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यावर सोपविली आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी विविध जिल्ह्यांच्या समन्वयकांच्या नियुक्त्या केल्या.
काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सहभागी झाला आहे. अलिकडे महायुतीत पक्ष वाढत आहेत. आता महायुतीत एकूण 11 पक्ष झाले आहेत. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षातील नेत्यांच्या विचारांची देवाण-घेवाण व्हावी, एकमेकांबद्दल व सरकार तसेच विकास निधीबाबत नाराजी लक्षात यावी आणि त्यावर वेळीच तोडगा काढणे हाच संमेलनाचा हेतू आहे. बीड जिल्ह्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यावर सोपविली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, बीडमध्ये (Beed) रविवारी (ता. १४) महायुतीतल्या सर्व पक्षांतील नेत्यांचे एकत्रित संमेलन होणार आहेत. विचारांची देवाण-घेवाण व आगामी निवडणुकीबाबतही या संमेलनात खल होईल. यानिमित्त महायुतीतल्या सर्व पक्षांतील प्रमुख नेते एकत्रित स्नेहभोजनही घेणार आहेत.
सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाने पक्ष वाढवण्यासाठी जोमाने काम सुरू केले आहे. पक्षाचे बीड जिल्ह्यात मोठे प्रस्थ आहे. आपापले बालेकिल्ले राखून पक्ष वाढविण्यासाठी घटक पक्षांतील पदाधिकाऱ्यांना सोबत घेण्यासाठी महायुतीतील घटकपक्ष प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान, जिल्हानिहाय होणाऱ्या महायुतीच्या संमेलनाकडे लक्ष लागले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.