Pune Congress : पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुकांची गर्दी, 'ही' नावं आली समोर!

Loksabha Election : काँग्रेसने मंगळवार सायंकाळपर्यंत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले होते.
Pune Congress
Pune CongressSarkarnama
Published on
Updated on

Pune news : पुणे लोकसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज पुणे काँग्रेसने मागवले होते. अर्ज करण्यासाठी मंगळवारपर्यंतची मुदत काँग्रेसकडून देण्यात आली होती. या कालावधीत एकूण 14 जणांनी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीचे आता सर्वांनाच वेध लागले आहेत, तर राजकीय पक्षांनीदेखील कंबर कसली आहे. दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने काँग्रेसकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. नुकतंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांचा पुणे दौरा झाल्यानंतर काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune Congress
Pune News : धंगेकरांना खासदारकीची 'हसीन सपने' पडतात; पुणे भाजपचा पलटवार

काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी याबाबतचे पत्रक काढून मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदत दिली होती. लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण माहितीसह आपले अर्ज मंगळवार सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत सादर करावे लागणार असल्याचे शिंदे यांनी पत्रकामध्ये नमूद केले होते.

दरम्यान, काँग्रेस हायकमांडकडून नुकतीच लोकसभा निवडणुकीसाठी निरीक्षकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना सातारा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे, तर माजी आमदार मोहन जोशी यांच्याकडे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे. संजय बालगुडे यांच्याकडे माढा, तर अभय छाजेड यांच्याकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे.

Pune Congress
Apne Apne Ram : पुण्यात कुमार विश्वास यांच्या 'अपने अपने राम' कार्यक्रमाचे आयोजन!
Pune Congress
Pune CongressSarakarnama

लोकसभा लढवण्यासाठी 'हे' आहेत इच्छुक -

मोहन जोशी, संजय बालगुडे, रवींद्र धंगेकर, अभय छाजेड, अनंत गाडगीळ, दीप्ती चवधरी, आबा बागुल, गोपाळ तिवारी, संगीता तिवारी, राजू कांबळे, मनोज पवार, यशराज पारखी, संग्राम खोपडे, अरविंद शिंदे, मुकेश धिवर, बाळासाहेब शिवरकर, दत्ता बहिरट, वीरेंद्र किराड, नरेंद्र व्यवहारे, दिग्विजय जेधे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com