Jalna Bribe Case : अंबडच्या तहसिलदारांना अडकवणारा तक्रारदार निघाला वाळूचोर; सुयोग सोळुंकेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या

Crime News: जालन्याच्या गोंदी पोलिसांनी ही कारवाई केली असून साळुंके यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी तडीपारीची कारवाई देखील झाल्याची माहिती आता समोर आली आहे. 2025 मधील एका प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
Bribe Case
Bribe Casesarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना साडेसहा लाखांची लाच घेतल्या प्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणात ज्या सुयोग सोळुंके याने अॅन्टीकरप्शन विभागाला तक्रार दिली होती, तोच आता पोलिसांच्या कचाट्यात सापडला आहे. अवैध वाळू उत्खनन, वाहतूक व इतर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या साळुंके याला पोलिसांनी सोमवारी (ता.8) बेड्या ठोकल्या आहेत.

जालन्याच्या गोंदी पोलिसांनी ही कारवाई केली असून साळुंके यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी तडीपारीची कारवाई देखील झाल्याची माहिती आता समोर आली आहे. 2025 मधील एका प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याने अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या लाच प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.

बीड आणि जालना या दोन जिल्ह्यात अनुक्रमे पोलीस अंमलदार बळवंत आणि अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावर लाच प्रकरणी कारवाई आणि अटक प्रकरणाने एकच खळबळ उडाली होती. याची प्रशासनात चर्चा सुरू असतानाच आता तहसीलदार लाच प्रकरणात तक्रार करणाराच पोलिसांच्या रडावरवर आल्याचे दिसून आले आहे. तक्रारदार सुयोग साळुंके हा स्वतः वाळूचोर असल्याचे समोर आले असून त्याच्यावर अवैध वाळू उपसा, वाहतुकीसह इतर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

तहसीलदार विजय चव्हाण यांनी लाच मागितल्याप्रकरणी सुयोग साळुंके यानेच अॅन्टीकरप्शन विभागाला टीप दिली होती. साडेसहा लाखांची लाच स्वीकारताच पथकाने चव्हाण यांच्यावर सापळा टाकून त्यांना रंगेहाथ पकडले होते. या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडालेली असतानाच आज या प्रकरणाला वेगळेच वळण लागले. तक्रारदार वाळूचोर निघाल्याने या लाच प्रकरणाबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

Bribe Case
Mamata Banerjee News: बंडखोरांनी 'टीएमसी' पक्ष फोडला, ममता बॅनर्जींसाठी दिलासादायक बातमी आली समोर; संकटकाळात 'हा' बडा नेता ढाल बनला

सुयोग सोळुंके याच्यावर 2025 मध्ये अवैध वाळू चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात पोलिसांनी त्याला आता अटक केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सुयोग सोळुंकेवर अवैध वाळू उत्खनन, वाळू चोरी आणि मारहाणीसह विविध गंभीर गुन्हे दाखल होते. तसेच त्याच्यावर एक वर्षासाठी तडीपारीची कारवाईही देखील करण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वीच त्याची या कारवाईतून जामिनावर सुटका झाली होती.

दरम्यान, अवैध वाळू उत्खननासाठी वापरल्या जाणारे पोकलेन मशीन आणि सहा हायवा वाहने सुरू ठेवण्यासाठी सोळुंके याने तहसीलदार विजय चव्हाण यांना 6 लाख 40 हजार रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तहसीलदार विजय चव्हाण यांना रंगेहाथ अटक केली होती.

Bribe Case
Raj Thackeray : राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? उद्धव ठाकरेंकडून 'मध्यस्थी'? दिवसभरातील पाच घडामोडींमुळे चर्चा

आता वाळू चोरीच्या गुन्ह्यात सुयोग सोळुंके याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी सुयोग सोळुंकेवर यापूर्वी एमपीडीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. पोलीस ठाणे गोंदी गु र नं 217/2025, 218/2025, 230/2025 सर्व कलम 303(2),3(5) भा न्या सं सह कलम 3, 4 गौण खनिज (विकास व विनियमन) प्रतिबंध अधिनियमान्वये हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात, त्याची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com