Mamata Banerjee News: बंडखोरांनी 'टीएमसी' पक्ष फोडला, ममता बॅनर्जींसाठी दिलासादायक बातमी आली समोर; संकटकाळात 'हा' बडा नेता ढाल बनला

West Bengal News: एकेकाळी पश्चिम बंगालसारख्या राज्याची 15 वर्षे सत्ता ताब्यात राखलेला टीएमसीसारखा मोठा पक्ष विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पूर्णपणे कोलमडला आहे. आमदार- खासदारांच्या एकामागोमाग बंडखोरीमुळे ममता बॅनर्जी स्वत: हादरल्या आहेत. अशातच तृणमूलचे खासदार सौगत रॉय यांनी मोठा राजकीय निर्णय घेतला आहे.
Mamata Banerjee
Mamata BanerjeeSarkarnama
Published on
Updated on

West Bengal News: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींना सत्ता गमवावी लागली.हा धक्का सहन करत नाही,तोच तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी राजकीय फूट पडली आहे. टीएमसीचे जवळपास 58 आमदार आणि 20 खासदार फुटले आहेत. आमदारांच्या बंडखोरीनंतर खासदारांनीही वेगळा गट स्थापन करत एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पण एकीकडे हे धक्के सहन करणाऱ्या माजी मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

एकेकाळी पश्चिम बंगालसारख्या राज्याची 15 वर्षे सत्ता ताब्यात राखलेला टीएमसीसारखा मोठा पक्ष विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पूर्णपणे कोलमडला आहे. आमदार- खासदारांच्या एकामागोमाग बंडखोरीमुळे ममता बॅनर्जी स्वत: हादरल्या आहेत. अशातच तृणमूलचे खासदार सौगत रॉय यांनी मोठा राजकीय निर्णय घेतला आहे.

खासदार सौगत रॉय यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी भाजपने आपल्याला पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिल्याचा दावा केला आहे. मात्र,एकीकडे पक्षफुटत असताना त्यांनी भाजपकडून देण्यात आलेली पक्षप्रवेशाची ऑफर नाकारली आहे.

माजी मुख्यमंत्री व टीएमसीच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्येच राहणार असल्याचा इरादा बोलून दाखवला आहे. यावेळी त्यांनी हो,मला भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर मिळाली होती. मात्र, मी ती नाकारली.

Mamata Banerjee
NCP foundation day News : राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा 'या' कारणामुळे पुढे ढकलला; नेमके कारण आले समोर

मी ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकली आहे, मी त्याच पक्षातच राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. राज्यसभेचे वरिष्ठ खासदार सुखेंदू रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडत पक्षनेतृत्वावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर सौगत रॉय यांनीही आपली भूमिका मांडली.

सुखेंदू शेखर रॉय यांनी खासदारकीचाही राजीनामा दिला असून त्यांनी भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या निवासस्थानी भेट दिल्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र, सुखेंदू शेखर रॉय यांच्या पक्षत्याग फार महत्त्व देण्यासारखा नसल्याचा टोलाही सौगत रॉय यांनी लगावला आहे.

Mamata Banerjee
Ajit Pawar Death: अजित पवारांच्या निधनावर वादग्रस्त विधान : राष्ट्रवादी काँग्रेसमधून लाडक्या नगरसेवकाची हकालपट्टी

आमचा तृणमूल काँग्रेस पक्ष सत्तेबाहेर गेल्यानंतर सध्या काही नेत्यांनी पक्ष सोडण्याचा मार्ग धरला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. प्रत्येकामध्ये राजकारणातील पराभव सामोरे जाण्याचं बळ नसतं. त्यामुळे अशी मंडळी परिस्थिती प्रतिकूल होताच आपली भूमिका बदलत असतात. सध्या तेच घडत असल्याचा हल्लाबोलही सौगत रॉय यांनी टीएमसीच्या बंडखोर आमदार-खासदारांवर केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com