Lok Sabha Election 2024 : ‘नागपुरातील महारॅलीपर्यंत हात दाखवत अवलक्षण करू नका!’

Congress : पक्षातील सर्वच निरीक्षक, जबाबदार नेत्यांना आदेश; सभेसाठी जोरदार तयारीला सुरुवात
Congress Maharally in Nagpur.
Congress Maharally in Nagpur.Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur Politics : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उपराजधानी नागपूर येथून रणशिंग फुंकणार आहे. यासाठी गुरुवारी (28 डिसेंबर) महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाचे दिग्गज नेते नागपुरात येणार आहे. महारॅलीला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने कोणतीही चूक करू नका! किरकोळ चुकांमधून हात दाखवत तर अजिबात अवलक्षण करून घेऊ नका, अशा सक्त सूचना सर्वच पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

नागपूर येथील महारॅलीत 10 लाखाची गर्दी जमविण्याची जबाबदारी राज्यातील सर्वच जिल्ह्यांना देण्यात आली आहे. विदर्भात ही सभा होत असल्याचे या प्रदेशातील नेत्यांवर मोठी जबाबदारी आहे. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून जास्तीत जास्त लोक सभेला यावेत, यासाठी आता तयारीने जोर धरला आहे.

Congress Maharally in Nagpur.
Lok Sabha Election 2024 : राहुल, सोनियांच्या उपस्थितीत नागपुरातून काँग्रेस फुंकणार रणशिंग

विधानसभा मतदारसंघनिहाय गर्दी नागपुरात जमा करण्यासाठी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व विधानसभा प्रमुख, निरीक्षक यांना कामाला लावण्यात आले आहेत. महारॅली होईपर्यंत निरीक्षकांना विधानसभा क्षेत्र सोडता येणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक ब्लॉकमधून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते नागपुरात पाठविण्यासाठी ब्लॉक अध्यक्ष, बुथप्रमुखांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. ‘हम तय्यार है’ असे महारॅलीचे घोषवाक्य राहणार आहे.

महारॅलीसाठी दररोज दिवसातून अनेकदा फोनवरून प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यास शनिवारपासून (23 डिसेंबर) सुरुवात करण्यात आली आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याचा आता दररोज आढावा घेतला जाणार आहे. महारॅलीला गर्दी हेच सध्या काँग्रेसचे लक्ष्य आहे. खर्गे, सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासमोर आपले जोरदार शक्ती प्रदर्शन दिसावे यासाठी लोकसभा व विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेले नेते कामाला लागले आहेत. निवडणुकीच्या शर्यतीत नसलेले नेते व पदाधिकारी मात्र अद्यापही शांतच आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोणता नेता महारॅलीत किती योगदान देणार, याची बारकाईने तपासणी केली जात आहे. यासाठी जिल्हा समन्वयक म्हणून नेमलेल्या व्यक्तीवर विशेष जबाबदारी आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील ब्लॉकमधून नागपुरात येणाऱ्या वाहनांची क्रमांकासह यादी तयार करण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक ब्लॉक पातळीवर एक पदाधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. वाहनांचा मार्ग, फोटोंसह ब्लॉकनिहाय यादी प्रदेश पातळीवर पाठविण्यासाठी खास व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. प्रदेश समिती यावर लक्ष ठेवून आहे.

नागपुरात येणाऱ्या वाहनावर पक्षाचे झेंडे, ‘हम तय्यार है’ महारॅलीचे पोस्टर्स, नेत्यांचे फोटोही लावण्यात येणार आहे. प्रत्येक चालकाचा व वाहनातील एका टीम लिडरचा क्रमांकही प्रदेश समितीला कळविण्यात येत आहे. प्रदेश पातळीवरून प्रत्येक जिल्हा, तालुका व ब्लॉक पातळीसाठी समन्वयकाची नेमणूक करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीती दिल्लीतील नेत्यांपुढे महाराष्ट्र काँग्रेसचे जबरदस्त शक्तीप्रदर्शन दिसावे यासाठी जोरात प्रयत्न सुरू आहेत.

Edited by : Prasannaa Jakate

Congress Maharally in Nagpur.
Lok Sabha Election 2024 : ठाकरे गट बॅकफूटवर; लोकसभेच्या 'या' महत्त्वाच्या जागा शरद पवारांना सोडणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com