EVM Hack News : जवानाची अंबादास दानवेंचा EVM हॅक करण्याची ऑफर, काय आहे इनसाइड स्टोरी?

Police : अंबादास दानवेंच्या तक्रारीनंतर आम्ही दानवे यांच्या भावामार्फत ढाकणे याला एक लाख रुपये देण्याचा निर्णय घेत सापळा रचला होता.
 Ambadas Danve
Ambadas Danvesarkarnama

Ambadas Danve : नगर जिल्ह्यातील लष्करी जवान मारुती ढाकणे याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना फोन करून संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील सर्व मशीन हॅक करुन देतो. त्यासाठी अडीच कोटी रुपये द्या, मी ईव्हीएम मशीनचे सर्व मॅनेजमेंट पाहतो, अशी थाप मारत एक लाख रुपये घेताना पुणे आर्थिक विभागाच्या पोलिस पथकाने ढाकणे याला एका हाॅटेलातून ताब्यात घेतले. या प्रकाराची माहिती स्वतः अंबादास दानवे यांनी माध्यमांना दिली. मात्र ढाकणे याने असे का केले याची माहिती समोर येत आहे.

 Ambadas Danve
Eknath Shinde News : मराठा आरक्षण टिकेल, मोदींच्या समोरच एकनाथ शिंदे काय म्हणाले?

छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी सांगितले की, मारुती ढाकणे हा तरुण जम्मूमध्ये लष्करात जवान म्हणून कामाला आहे. डोक्यावर प्रचंड कर्ज वाढल्यामुळे कुठल्या न कुठल्या मार्गाने पैसे मिळवण्यासाठी त्याने ही भामटेगिरी केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे Ambadas Danve यांना फोन करून तो वारंवार पैशाची मागणी करत होता.

अंबादास दानवेंच्या तक्रारीनंतर आम्ही दानवे यांच्या भावामार्फत ढाकणे याला एक लाख रुपये देण्याचा निर्णय घेत सापळा रचला होता. हे पैसे स्वीकारताना ढाकणे याला पुणे पोलिसांनी Pune Police अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली असता तो नगर जिल्ह्यातील असून जम्मू येथे लष्करी सेवेत असल्याचे समोर आले आहे. डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्यामुळे पैसे मिळवण्याच्या हेतूने त्याने अंबादास दानवे यांना फोन केला होता. ईव्हीएम मशीन हॅक करण्याचे कोणतेही ज्ञान आरोपीला नाही, असे आयुक्त मनोज लोहिया यांनी सांगितले.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com