Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईत सर्वात मोठी घरफोडी! 53 तोळे सोनं, चांदी आणि रोकड लंपास; तलावात फेकला DVR, 2 आरोपी अटकेत

Ambajogai house burglary case latest news : अंबाजोगाईतील मोठ्या घरफोडीप्रकरणी 53 तोळे सोनं, चांदीचे दागिने आणि रोकड लंपास करण्यात आली. पोलिसांनी तपास करत 2 आरोपींना अटक केली असून तलावात फेकलेला DVRही शोधला.
Ambajogai biggest house robbery
Ambajogai biggest house robberySarkarnama
Published on: 
Updated on: 

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात बंद घर हेरून झालेल्या मोठ्या घरफोडीचा पोलिसांनी छडा लावला आहे. या चोरीत तब्बल 53 तोळे सोनं, पावणेदोन किलो चांदी आणि सुमारे 5.5 लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली होती. चोरीनंतर पोलिसांच्या तपासापासून वाचण्यासाठी आरोपींनी घरातील CCTV चा DVR, कपडे आणि इतर साहित्य तलावातील पाण्यात फेकून दिले. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासामुळे अखेर या गुन्ह्याचा उलगडा झाला.

अंबाजोगाई शहरातील सारडा यांचे घर बंद असल्याची माहिती रिक्षाचालक अमर काकासाहेब थोरात याला होती. त्याने घराची पाहणी करून रेकी केली. त्यानंतर सराईत गुन्हेगार जगजितसिंग अचलसिंग दुधानी आणि फरार आरोपी मंगलसिंग बावरी यांच्या मदतीने घराचे कुलूप तोडून चोरी करण्यात आली.

Ambajogai biggest house robbery
Ujjain Shahi Masjid Controversy : शाही मशिदीवरून वाद पेटला! जमावाकडून पोलिसांवर दगडफेक; अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, नेमकं काय घडलं?

चोरीनंतर आरोपी अंबाजोगाईतील तलावाच्या परिसरात पोहोचले. याठिकाणी चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने तोडून त्यांची आपापसात वाटणी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांना कोणताही पुरावा मिळू नये, यासाठी आरोपींनी हातमोजे, जॅकेट, कपडे तसेच घरातील CCTV चा DVR तलावाच्या घाण पाण्यात फेकून दिला.

मात्र पोलिसांनी तपास सुरू ठेवत परिसरातील 50 पेक्षा अधिक CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. संशयितांच्या हालचालींचा माग काढल्यानंतर पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्यानंतर तलावात शोधमोहीम राबवून DVR बाहेर काढण्यात आला. या DVR मुळे तपासाला निर्णायक दिशा मिळाली.

Ambajogai biggest house robbery
Modi cabinet reshuffle : भाजपच्या दिग्गज महिला नेत्याचे मोदी मंत्रिमंडळात कमबॅक? दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग

यानंतर पोलिसांनी परळी परिसरात सापळा रचून अमर थोरात आणि जगजितसिंग दुधानी यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 27 तोळे सोनं आणि 858 ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील मंगलसिंग बावरी अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com