

Latur Politics : काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी लातूर येथे एका जाहीर कार्यक्रमात टिपू सुलतान यांचे कार्य व त्यांनी दाखवलेला मार्ग याबाबत येणाऱ्या पिढीला माहिती देण्याची गरज आहे, असे विधान केले आहे. जयंतीसाठी येणाऱ्या काळात आवश्यक मदत केली जाईल आणि यासाठी लागणाऱ्या मदतीसाठी महापालिकेकडून सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
अमित देशमुख यांच्या या विधानावरून भाजपामध्ये संताप पसरला आहे. देशमुख यांनी टिपू सुलतान यांच्याबाबत केलेले विधान लातूर शहरात आयोजित टिपू सुलतान जयंतीनिमित्त कव्वाली कार्यक्रमात उपस्थित असताना केले. या विधानावरून राज्याच्या राजकारणात वाद निर्माण झाला आहे. खासदार अशोक चव्हाण, मंत्री नितेश राणे यांच्यासह अनेकांनी अमित देशमुख यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
अमित देशमुख यांना टिपू सुलतानबद्दल किती माहिती आहे?, असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला आहे. देशमुख यांचा टिपू सुलतानबद्दल किती अभ्यास आहे, त्यांनी काही वाचले आहे का? मला माहित नाही. टिपू सुलतानचे कार्य, मार्ग नव्या पिढिला माहित असावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. पण यासाठी राज्यात, केंद्रात तुमच्याकडे सत्ता आहे का? उगाच बोलायचे म्हणून काहीही बोलायचे का? अशा विषयावर भाष्य करण्याआधी जनभावना लक्षात घेतल्या पाहिजे, असा सल्लाही अशोक चव्हाण यांनी देशमुखांना दिला.
कार्यक्रमानंतर अमित देशमुख यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत टिपू सुलतान यांचा उल्लेख 'शेर-ए-हिंद' आणि 'शहीद हजरत टिपू सुलतान'असा केला. तसेच, कव्वालीच्या माध्यमातून टिपू सुलतान यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.
धर्म, जात आणि पंथाच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा सन्मान करणे, परस्परांमध्ये प्रेम, आदर आणि विश्वास वाढवणे हाच सामाजिक सलोखा व सहअस्तित्वाचा खरा अर्थ असल्याचे देशमुख यांनी सांगितले. अशा उपक्रमातून सर्व धर्म समभावाची भावना जपली जावी, असे आवाहनही त्यांनी केले. भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी अमित देशमुख यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी काँग्रेसवर मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.