IAS Officer Harassment : धक्कादायक : आमदाराकडून महिला जिल्हाधिकाऱ्यांना अश्लील मेसेज, नशेत गेले निवासस्थानी? हायकोर्टात याचिका, राज्यपालांसह महिला आयोगाकडूनही दखल

C Arul Vignesh, TVK MLA, Vijay Government, Woman District Collector : राज्यपालांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून पोलीस महानिरीक्षकांकडे याप्रकरणी विचारणा केली आहे. द्रमुक, अण्णा द्रमुक आणि भाजप या विरोधी पक्षांनी थेट मुख्यमंत्री विजय यांच्यावर निशाणा साधला आहे.
IAS Officer Harassment
IAS Officer HarassmentAI Image
Published on: 
Updated on: 

Tamil Nadu Politics : तामिळनाडूमधील सत्ताधारी तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाचे आमदार सी. अरुल विग्नेश यांच्या अडचणी वाढल्या आहेत. महिला जिल्हाधिकाऱ्यांना अश्लील मेसेज पाठवून मानसिक छळ केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यावरून राज्यातील सरकार अडचणीत आले असून विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे.

आमदाराविरोधात आता मद्रास हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. चेन्नईतील वकील आर. त्रिशुली यांनी ही याचिका दाखल करत विग्नेश यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत, अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडूनही यापूर्वीच पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यपालांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून पोलीस महानिरीक्षकांकडे याप्रकरणी विचारणा केली आहे. द्रमुक, अण्णा द्रमुक आणि भाजप या विरोधी पक्षांनी थेट मुख्यमंत्री विजय यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री आमदाराचा बचाव करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आमदार विग्नेश यांना तातडीने पक्षातून बडतर्फ करत गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

IAS Officer Harassment
Congress politics : काँग्रेसमधील काही नेत्यांमुळेच मोदी जेलमध्ये जाण्यापासून वाचले! बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने खळबळ, कोण होते ते नेते?

दरम्यान, याचिकाकर्त्या वकिलांनी दाखल याचिकेत म्हटले आहे की, 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही घटना सुमारे दोन महिन्यांपूर्वी घडल्याचे म्हटले आहे. संबंधित महिला जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार केली असली त्यावर कोणताही कारवाई झालेली नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

नशेत जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी

DMK खासदार कनिमोळी यांनीच काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच आमदार विग्नेश यांच्याविरोधात जाहीरपणे आरोप केले होते. आमदारांनी महिला IAS अधिकाऱ्याला अश्लील संदेश पाठवले, तसेच कथितरीत्या मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या निवासस्थानी गेल्याचे आरोप त्यांनी केले होते. या घटनांनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र सुरक्षा अधिकारी नेमण्यात आल्याचेही सांगितले जाते.

IAS Officer Harassment
Gokul Dairy News : 'गोकुळ'मध्ये मोठा धमाका; प्रशासकांनीच फोडलं तत्कालीन संचालक मंडळाचं बिंग, निर्णयांवर थेट प्रहार

आरोप फेटाळले

आमदार अरुल विग्नेश यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी १० नोव्हेंबर रोजी कल्लाकुरिची येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना हे विरोधकांचे गलिच्छ राजकारण असल्याचे म्हटले आहे. आपली आणि सत्ताधारी पक्षाची बदनामी करण्यासाठी अफवा पसरवल्या जात आहेत. सरकारी अधिकाऱ्यांविषयी आपल्या मनात नेहमीच आदर असल्याचेही आमदारांनी सांगितले. स्थानिक बसस्थानकाच्या प्रकल्पाबाबत तक्रारी केल्यामुळे लक्ष्य केले जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.