Shahajibapu Advice Mohite Patil : शहाजीबापूंचा मोहिते पाटलांना अनाहुत सल्ला; ‘बारामतीकरांनी वाटुळं केलंय, त्यांच्याकडे जाऊ नका’

Madha Lok Sabha Constituency : आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेचे आमदार केले आहे. मोहिते पाटील यांच्या अनेक संस्थांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले आहे, त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपला स्वीकारले आहे.
Dhaiyasheel Mohite Patil-Shahaji Patil
Dhaiyasheel Mohite Patil-Shahaji PatilSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 09 April : माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने मोहिते पाटील यांनीही निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. शरद पवार यांच्या पक्षाकडून तुतारी चिन्हावर निवडणूक लढविण्याचे संकेत मोहिते पाटील यांच्याकडून देण्यात आले आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चाही केली आहे. निवडणूक लढविण्यासाठी लंगोट बांधून तयार असलेल्या मोहिते पाटलांना सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी अनाहुत सल्ला दिला आहे. ‘ज्या बारामतीकरांनी मोहिते पाटलांचे पार वाटुळे केले. त्या बारामतीकरांकडे मोहिते पाटील यांनी पुन्हा जाऊ नये,' असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंढरपुरात मेळावा झाला. त्या मेळाव्यात बोलताना आमदार शहाजी पाटील यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीकास्त्र सोडत मोहिते पाटील यांना अनाहुत सल्ला दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhaiyasheel Mohite Patil-Shahaji Patil
Bhalke Group Meeting : प्रणिती शिंदेंना मदत करू; पण विधानसभेचा शब्द घ्या : भगीरथ भालकेंवर समर्थकांचा दबाव

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेचे आमदार केले आहे. मोहिते पाटील यांच्या अनेक संस्थांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले आहे, त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला स्वीकारले आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील अशा परिस्थितीत अचानक कुणाला असा निर्णय घेऊ देतील, असं मला वाटत नाही. माझा मोहिते पाटील कुटुंबाशी जिव्हाळा आहे. मोहिते पाटील घराण्याने वेडंवाकडं जायचं धाडस करू नये, हे विठ्ठलाच्या साक्षीने सांगतो, असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

आपलं मोहित्यांचं ज्यांनी भरपूर वाटुळं केलं, त्या बारामतीकरांकडे कृपया करून जाऊ नका, असा सल्ला द्यायलाही शहाजीबापू पाटील विसरले नाहीत. याच शहाजीबापूंनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीचे उघड समर्थन केले होते. तेच आता मोहिते पाटील यांना सल्ला देत आहेत.

Dhaiyasheel Mohite Patil-Shahaji Patil
Solapur BJP : 'सोलापूर, माढ्यात भाजपविरोधात वातावरण'; अजित पवार गटाच्या नेत्यानेच पेटवली वात

माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील (Dhaiyasheel Mohite Patil) हे तुतारी चिन्हावर लढण्याची शक्यता आहे. मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. ते मतदारसंघातील गावोगावी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मोहिते पाटील यांच्यावर समर्थकांकडून दबाव वाढत आहे.

R

Dhaiyasheel Mohite Patil-Shahaji Patil
Solapur Lok Sabha Constituency : सोलापुरात प्रणिती शिंदेंविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com