Amit Shaha Rally News : अमित शाहांचा संभाजीनगर दौरा पुन्हा आला, आता तरी येतील का?

Amit Shaha Rally News : मागचा दौरा अचानक रद्द...
Amit Shaha Rally News
Amit Shaha Rally NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा 15 फेब्रुवारीचा छत्रपती संभाजीनगर दौरा अचानक रद्द झाला होता. त्यानंतर आता पुन्हा येत्या मंगळवारी (ता.5) रोजी शाह हे संभाजीनगर दौऱ्यावर येणार असल्याचे भाजपच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. यापुर्वी मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाला अमित शाह संभाजीनगरात येणार होते. मात्र अचानक तेव्हा त्यांचा दौरा रद्द झाला होता. (Amit Shaha Rally News)

Amit Shaha Rally News
NCP News : गट नव्हे, पक्ष असाच उल्लेख करा; जयंत पाटलांचे मीडियाला आवाहन

त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ संभाजीनगरातून वाढवण्यासाठी शाह यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाने उग्र रुप धारण केल्यामुळे शाह यांचा संभाजीनगर व महाराष्ट्र दौरा अचानक रद्द करण्यात आला होता. आता तिसऱ्यांदा शाह यांच्या दौऱ्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे, आता तरी केंद्रीय गृहमंत्री येणार का? असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर अशा तीन लोकसभा मतदारसंघाचा मिळून तयार करण्यात आलेल्या क्लस्टरसाठीची अमित शाह यांची एकत्रित सभा यापुर्वी 15 रोजी शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर आयोजित करण्यात आली होती. या सभेची तयारी भाजपच्या स्थानिक मंत्री आणि नेत्यांकडून सुरू असतांना अचानक शाह यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला.

आता नव्याने 5 मार्च रोजी शाह यांच्या जाहीर सभेचे आयोजन त्याच मैदानावर करण्यात आले आहे. या सभेच्या पुर्वतयारीसाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी नुकतीच बैठकही घेतली. यापूर्वी मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त 17 सप्टेंबर 2023 च्या विशेष कार्यक्रमासाठी अमित शाह संभाजीनगरात येणार होते. त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि भाजपनेही (BJP) जय्यत तयारी केली होती.

Amit Shaha Rally News
Latur BJP Politcal News : बसवराज पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर फडणवीसांच्या लाडक्या आमदाराचं काय होणार?

या कार्यक्रमावर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, अचानक अमित शाह यांचा हा दौरा रद्द करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा 15 फेब्रुवारीचा शाह यांचा दौरा रद्द झाला होता. आता तिसऱ्यांदा त्यांच्या दौऱ्याची आणि सभेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाह यांचा दौरा महत्वाचा ठरणार आहे. या दौऱ्यात अमित शाह छत्रपती संभाजीनगर लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघाचा उमेदवार जाहीर करतात का? याकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com