Solapur Lok Sabha 2024 : राम सातपुतेंवर मिम्स बनवणे आले अंगलट; काँग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

Ram Satpute MIMs Viral Case : भाजपचे कार्यकर्ते समर्थ बंडे यांच्या तक्रारीवरून सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्ते राज सलगर याच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ram Satpute
Ram SatputeSarkarnama

Solapur, 3 May : सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यात काँटे की टक्कर सुरू आहे. जाहीर सभा, बैठका, रॅलीतून दोन्ही बाजूचे उमेदवार प्रचार करत आहेत. तसे त्यांचे समर्थक आता सोशल मीडियावरही एकमेकांशी लढाई लढत आहेत. दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांचे सोशल मीडियातील वॉर पोलिस ठाण्यापर्यंत जात आहे. त्यातूनच भाजपचे उमदेवार राम सातपुते यांची सोशल मीडियावर बदनामा केल्या प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) आणि भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विरोधात मिम्स तयार करून ते व्हायरल केले. त्यातून भाजप उमेदवार सातपुते यांची जनमाणसांतील प्रतिमा मलीन करण्यात आली. सोशल मीडियावर सातपुते यांची बदनामी केल्याप्रकारणी काँग्रेस (Congress) कार्यकर्ते राजू सलगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ram Satpute
Shinde Will Join BJP? : सुशीलकुमार शिंदे भाजपत जाणार?; नाना पटोलेंनी दिले हे उत्तर...

भाजपचे कार्यकर्ते समर्थ बंडे यांच्या तक्रारीवरून सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्ते राज सलगर याच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या भाजप उमेदवार राम सातपुते आणि भाजपच्या विरोधात मिम्स वायरल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. भारतीय दंड संहिता कलम 500 आणि 501 नुसार सलगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सोलापूरमधून राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी सोशल मीडियावर पत्र लिहून राजकीय लढाईला सुरुवात केली होती. त्यानंतर सातपुते आणि शिंदे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. दोघांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता सोशल मीडियावरून राम सातपुते यांचे मिम्स व्हायरल झाल्याने राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

Ram Satpute
Vitthal Sugar Factory : अभिजित पाटलांना दिलासा; ‘विठ्ठल’वरील कारवाई मागे, पाच तारखेपर्यंत गोदामे ताब्यात मिळणार

याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते राजू सलगर म्हणाले की, देशभरातील लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. सत्तेचा गैरवापर करून आमदार राम सातपुते हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम करत आहेत. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आम्ही आमचं मत मांडू शकतो. आम्ही सातपुते यांची सोशल मीडियावर बदनामी केली असं सांगितलं जात आहे, पण, लोकांना खरं सांगणं हा जर गुन्हा असेल तर आम्ही तो वारंवार करणार. घटनेने दिलेल्या अधिकारानुसार आम्ही बोलत राहणार. कुठल्याही दबावतंत्राला आम्ही बळी पडणार नाही, असे सलगर यांनी सांगितले.

Ram Satpute
Indapur Politics : हर्षवर्धन पाटील, दत्ता भरणे अन्‌ आमचं ठरलंय! ; अजित पवारांची गुगली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com