Sunetra Pawar Victory : 19 वी फेरी अन् 2019 मधील दादांच्या मताधिक्याचा विक्रम मोडला! सुनेत्रा पवार ऐतिहासिक विजयाच्या दिशेने...

Baramati By-election Record Win : ​बारामती पोटनिवडणुकीत एकूण २ लाख २३ हजार ७०५ मतदान झाले होते. जुना विक्रम मोडण्यासाठी सुनेत्रा पवार यांना १ लाख २३ हजार २६५ मतांची म्हणजे एकूण मतदानाच्या ५५% आवश्यकता होती. मात्र, १९व्या फेरीपर्यंत त्यांनी १ लाख ६८ हजारांची आघाडी घेत जुन्या सर्व विक्रमांना मागे टाकले आहे.
Sunetra Pawar
Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 04 May : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विजयाचा नवा इतिहास रचल्याचं पाहायला मिळत आहे. मतमोजणीच्या १९ व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांनी तब्बल १ लाख ६८ हजार मतांचे प्रचंड मताधिक्य घेत बारामतीच्या राजकारणात मताधिक्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

​१९व्या फेरीत विक्रमी आघाडी

बारामती पोटनिवडणुकीत एकूण २ लाख २३ हजार ७०५ मतदान झाले होते. जुना विक्रम मोडण्यासाठी सुनेत्रा पवार यांना १ लाख २३ हजार २६५ मतांची म्हणजे एकूण मतदानाच्या ५५% आवश्यकता होती. मात्र, १९व्या फेरीपर्यंत त्यांनी १ लाख ६८ हजारांची आघाडी घेत जुन्या सर्व विक्रमांना मागे टाकले आहे.

​मागील निवडणुकींच्या तुलनेत सर्वात मोठे मताधिक्य

​बारामती विधानसभा मतदारसंघातील मागील चार निवडणुकांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, सुनेत्रा पवार यांनी मिळवलेले मताधिक्य हे आतापर्यंतचे सर्वाधिक मताधिक्य ठरले आहे. यापूर्वी २०१९ मध्ये अजित पवार यांनी १ लाख ६५ हजार २६५ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता, जो आतापर्यंतचा उच्चांक होता.

Sunetra Pawar
West Bengal election result : भाजपने पोखरला ममतांचा बालेकिल्ला; ऐतिहासिक सत्तांतरात 'सात M फॅक्टर' ठरले गेमचेंजर

दरम्यान या पार्श्वभूमी सुनेत्रा पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सुनेत्रा पवार म्हणाले, आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये.

Sunetra Pawar
Tamil Nadu Results : तमिळनाडूत भल्याभल्यांना धूळ चारणाऱ्या विजय यांच्या पराभवाची बातमी ऐकून चाहत्याने कापून घेतला गळा, 'त्या' दोन मतदारसंघात आघाडी की पिछाडी?

आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया अशी विनंती सुनेत्रा अजित पवार यांनी केली आहे. दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी दिल्याबद्दल सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानतानाच हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची.. ! असा विश्वासही सुनेत्रा अजित पवार यांनी बारामतीकरांना दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com