Akshay Kardile Won Rahuri By Election 2026 : अक्षय कर्डिलेंचा सुस्साट 'विजय'; पहिल्या फेरीपासून मताधिक्य, प्रतिस्पर्धांच्या धुव्वा!

BJP candidate Akshay Kardile Won Rahuri Assembly By Election 2026 final result : राहुरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मोकाटे, वंचितचे संतोष चोळके आणि भाजपचे अक्षय कर्डिले यांच्यात थेट लढत झाली.
Rahuri Result 2026
Rahuri Result 2026Sarkarnama
Published on
Updated on

Rahuri Assembly ByElection 2026 final result : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी विजय मिळवला आहे. त्यांना 1 लाख 40 हजार 093 एवढी मतं मिळवली. अक्षय कर्डिलेंना 1लाख 12 हजार 587 मतांचं मताधिक्य मिळालं असून, प्रतिस्पर्धी उमेदवार त्यांचा विजय रथ रोखू शकले नाहीत.

पोटनिवडणूक चुरशीची होईल, असे चित्र अगोदरपासून रंगवण्यात आले होते. मतमोजणीनंतर मात्र चित्र वेगळं दिसलं अन् अक्षय कर्डिले यांची मताधिक्य मिळवण्याचा रथ एकतर्फा धावत सुटला.

राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपचे अक्षय कर्डिले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे बंडखोर उमेदवार रावसाहेब खेवरे यांच्यासह सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही निवडणुक बिनविरोध व्हावी, असा प्रस्ताव मांडला होता. मविआतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने इथं उमेदवार दिला. शरद पवार राष्ट्रवादीचे मूळ उमेदवार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी, भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर होत असलेल्या, या निवडणुकीत उमेदवारी न करण्याचे जाहीर केले. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादीने गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली गेली.

Rahuri Result 2026
Akshay Kardile win : वाढदिवशीच अक्षय कर्डिलेंना ‘विजयाची’ भेट; 'राहुरी' पोटनिवडणुकीत मतदारांचं 'रिटर्न गिफ्ट'!

शरद पवार यांच्या पक्षाने घेतलेल्या या भूमिकेवर भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी जोरदार टीका केली. भाजपने या राहुरी आथणि बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी 40 स्टार प्रचारक मैदानात उतरवले होते. तुलनेत मविआ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, वंचित, यांची ताकद मैदानात दिसलीच नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री पंकजा मुंडे, सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रसिंह राजेभोसले, आमदार गोपीचंद पडळकर, यांनी अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी मैदान गाजवले.

Rahuri Result 2026
Govind Mokate Bypoll History : गोविंद मोकाटेंचा पोटनिवडणुकीतील विजयाचा 'ट्रॅक रेकॉर्ड भारी'; 'राहुरी'च्या निकालाची वाढली धडधड!

शरद पवार राष्ट्रवादीकडून गोविंद मोकाटे यांच्या प्रचाराची धुरा खासदार नीलेश लंके यांनी वाहिली. या निवडणुकीत त्यांचाही करिश्मा चालला नाही. मतदारांनी निवडणूक हातात घेतली आहे, नक्कीच चमत्कार होईल, एवढाच ते दावा करत होते. वंचितचे संतोष चोळके यांनी निवडणुकीत ताकद दाखण्याचा प्रयत्न केला. पहिल्या टप्प्यात वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची सभा घेतली. त्यानंतर युवा नेते सुजात आंबेडकर यांची निवडणूक घेतली. पण त्यांना मते मिळवता आली नाहीत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे बंडखोर नेते रावसाहेब खेवरे यांनी राहुरीच्या अस्मितेसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याचा दावा करत शड्डू ठोकला. परंतु त्यांना अक्षय कर्डिले यांच्या आसपास जाता आले नाही. या निवडणुकीत अक्षय कर्डिलेंनी विरोधकांना अनामत रक्कम देखील जप्त होईल, एवढं मताधिक्य मिळवलं.

या पोटनिवडणुकीत सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. टपाली मत मोजणीसाठी दोन टेबल होते. ईव्हीएम मशीनमधील मतमोजणीसाठी 14 टेबलांवर 27 फेऱ्या झाल्या. एकूण मतदार 3 लाख 33 हजार 545 एवढे होते. त्यात 1 लाख 86 हजार 405 मतदान झाले. या एकूण मतदानात 1 लाख 1 हजार 991 पुरूष, तर 84 हजार 414 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

उमेदवारांना मिळालेली मतं पुढीलप्रमाणे

भाजप अक्षय कर्डिले : 1 लाख 40 हजार 093

शरद पवार राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे : 27 हजार 506

वंचित संतोष चोळके : 5 हजार 90

अपक्ष रावसाहेब खेवरे : 7 हजार 299

अपक्ष अर्थव म्हस्के : 1 हजार 148

अपक्ष सूर्यभान लांबे : 1 हजार 368

अपक्ष महेश हापसे : 2 हजार 51

नोटा : 1 हजार 632

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com