Shivsena-BJP News : युतीचा विसर पडला? राष्ट्रवादीला हाताशी धरत शिवसेनेनं उलटवला डाव; माजी आमदार ज्ञानराज चौंगुलेंचा भाजपला दणका

Umarga Panchayat Samiti : उमरगा पंचायत समितीच्या सभापतीपदावरून शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष झाला. माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी राजकीय डावपेच रचत मुलगी आकांक्षा चौगुले यांना सभापतीपदी बसवत भाजपला धक्का दिला.
Former MLA Dnyanraj Chougule celebrates with supporters after daughter Akanksha Chougule becomes Umarga Panchayat Samiti Chairperson, delivering political setback to BJP.
Former MLA Dnyanraj Chougule celebrates with supporters after daughter Akanksha Chougule becomes Umarga Panchayat Samiti Chairperson, delivering political setback to BJP.Sarkarnama
Published on
Updated on

Umarga Politics News : उमरगा, लोहारा पंचायत समितीवर सभापती, उपसभापती बसवण्यासाठी शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केलेल्या राजकीय खेळीने मित्रपक्ष भाजपाच घायाळ झाला आहे. उमरगा पंचायत समितीत महायुतीचे सरळ बहुमत असताना सभापतीपदासाठी शिवसेना व भाजपमध्ये संघर्षाची ठिणगी पेटली. शिवसेनेनेही आपला राजकीय रंग दाखवत भाजपची खेळी उलटवून टाकली.

पक्षांतरामुळे सत्तेची धुळवड, निष्ठेचा बेरंग झाल्याची स्थिती उमरगा तालुक्याच्या राजकारणात पहायला मिळाल्याची चर्चा यानंतर रंगू लागली आहे. काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या तालुक्यात नेत्यांच्या पक्षांतरामुळे राजकीय दिशा बदलली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला संधी असताना पक्षांतर्गत विरोध अन् पाडापाडीचे राजकारण झाले.

जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक महायुती म्हणून झाली खरी, पण एकमेकांचे पाय ओढण्यात शक्ती खर्ची घातल्याने त्याचा फटका तुरोरी, कुन्हाळी आणि आलूर जिल्हा परिषद गटांमध्ये भाजपला बसला. उमरगा तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला बहुमत असतानाही सभापतीपदावरून शिवसेना व भाजपमध्ये स्पर्धा निर्माण झाली.

Former MLA Dnyanraj Chougule celebrates with supporters after daughter Akanksha Chougule becomes Umarga Panchayat Samiti Chairperson, delivering political setback to BJP.
Ashok Chavan : नांदेड महापालिकेत विरोधी पक्ष नेते पदासाठी काँग्रेसचे अशोक चव्हाणांना साकडे? माजी महापौरांच्या मुलाने घेतली भेट, चर्चांना उधाण

तडजोडीला उशीर झाल्याने भाजपाच्या हातून संधी गेली. शिवसेनेने उमरगा पालिकेतील काँग्रेसच्या फॉर्म्युल्यावर नाराज राष्ट्रवादी व भाजपच्या मुळज गटाला सोबत घेत पंचायत समितीवर वर्चस्व मिळविले. सभापतीपद बिनविरोध झाले, तर भाजप समर्थक अपक्ष रेखा इंगळे यांना उपसभापतीपद मिळाले. लोहारा पंचायत समितीतही शिवसेनेने भाजपला दूर ठेवले. या राजकीय खेळीमुळे भाजपमधील अंतर्गत वाद आता तीव्र होण्याची शक्यता आहे.

Former MLA Dnyanraj Chougule celebrates with supporters after daughter Akanksha Chougule becomes Umarga Panchayat Samiti Chairperson, delivering political setback to BJP.
Latur ZP President : काँग्रेस सत्तेबाहेर, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपचा अध्यक्ष, लातूर झेडपीमध्ये सत्ता समीकरण जुळलं!

चौगुलेंचा मास्टर स्ट्रोक, मुलगी झाली सभपाती

माजी आमदार, शिवसेनेचे उपनेते ज्ञानराज चौगुले यांना मुलगी आकांक्षा हिला सभापती पदावर बसवत मास्टर स्ट्रोक लगावला. विजयी मिरवणुकीत ते मुलीसोबत नाचले. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चौगुले यांना अपयश आले असले तरी मतदारसंघातील आपले राजकिय वजन अजूनही आहे, हे त्यांनी या निवडणुकीतून दाखवून दिले. उमरगा नगरपालिका, उमरगा व लोहारा पंचायत समितीवरील सत्तेमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com