Harshvardhan Jadhav News : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. संजना जाधव यांना कन्नड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देखील मिळाली आहे. मात्र, हर्षवर्धन जाधव यांनी आपलं कुटुंब फोडल्याचा आरोप करत दिवाळी करायला घरात कोणी राहिले नसल्याचे म्हटले आहे.
'माझं घरं फोडलं, माझ्या विरोधात साक्षात माझ्या पत्नीला उभं करण्याचं पाप झालेलं आहे. याचा मी जाहीर निषेध करतो. मतदारसंघातील लोक यांना यांची जागा निश्चित दाखवतील.', असे हर्षवर्धन जाधव म्हणाले आहेत.
'मला फक्त वेदना होतात हे सगळं म्हणत असताना, कारण शेवटी संसार माझा होता. असो ठोकून काढू कारण हे धर्मयुद्ध आहे. आणि धर्मयुद्धात भगवतगीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं हे आमचं तोंडपाठ आहे.', असे म्हणत हर्षवर्धन जाधव यांनी प्रतिआव्हान दिले आहे.
कन्नड मतदारसंघातून शिवसेनेकडून संजना जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच मतदारसंघाचे हर्षवर्धन जाधव हे माजी आमदार देखील आहेत. याच मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात पती विरुद्ध पती असा सामना होणार आहे. तर, उदयसिंह राजपूत यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
कन्नड मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात असलेले हर्षवर्धन जाधव हे लोकसभेला देखील अपक्ष म्हणून उभे होते. मात्र, त्यांना फक्त 39 हजार येवढीच मतं मिळाली होती. 2019 च्या लोकसभेला अपक्ष लढून तब्बल 2 लाख 83 हजारांवर मतं मिळाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.