Solanke and Adaskar News : विधानसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी सोळंके - आडसकरांचा पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी खांद्याला - खांदा!

Beed Lok Sabha Constituency News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आणि सर्वच राजकीय समीकरणे बदलली.
Solanke and Adaskar
Solanke and AdaskarSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : मागच्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांना भिडलेले आमदार प्रकाश सोळंके व भाजपचे रमेश आडसकर आगामी निवडणुकीत देखील एकमेकांना पुन्हा भिडणार हे निश्चित आहे. मात्र, आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासाठी दोघेही एकत्र प्रचार करताना दिसत आहेत. रविवारी पंकजा मुंडे यांनी वडवणी तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात प्रकाश सोळंके, रमेश आडसकर यांच्यासह भाजव व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकत्र होते.

भाजपकडून लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे रिंगणात आहेत. यापूर्वी जिल्ह्यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी पक्ष होते. मागची लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणूक देखील या पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढविल्या. आता होणारी लोकसभा निवडणूक देखील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होणार होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आणि सर्वच राजकीय समीकरणे बदलली. ज्या राष्ट्रवादीला भाजपच्या विरोधात लढायचे होते आज त्यांच्यावरच भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा प्रचार करण्याची वेळ आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Solanke and Adaskar
Beed Loksabha Election : OBC नेत्या म्हणवून घेणाऱ्या पंकजा मुंडे तेव्हा कुठे होत्या? ; टी.पी.मुंडेंचा सवाल!

दरम्यान, आता पंकजा मुंडे यांच्यासाठी जिल्ह्यातील सगळ्याच भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांनी आपापल्या परिने प्रचाराची सुरुवात केली आहे. पदाधिकारी व बुथ प्रमुखांचे मेळावे, गावागावांत भेटी - गाठींचे सत्र सुरु आहे. मात्र, वेगवेगळ्या पक्षांचे नेते आपापल्या गटांनी प्रचार करत आहेत. माजलगावला विधानसभा निवडणुकीत एकमेकांना भिडलेले व आगामी विधानसभेला पुन्हा एकमेकांना भिडण्यासाठी सज्ज असलेले आमदार प्रकाश सोळंके व रमेश आडसकर हे दोघे रविवारी पंकजा मुंडे यांच्या प्रचार दौऱ्यात एकत्र होते.

प्रकाश सोळंके आमदार असल्याने ते कामांची उद्घाटने, लोकार्पण अशा कामांच्या निमित्ताने मतदार संघात संपर्कात आहेत. तर, भाजपचे रमेश आडसकर देखील मागच्या साडेचार वर्षांपासून मतदार संघातील लोकांचे वैयक्तीक व सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमित्ताने कायम संपर्कात आहेत.

Solanke and Adaskar
Beed Loksabha Election : 'तुतारी' चिन्हावरच मतदान करण्याची बीडमधील 'या' ग्रामस्थांनी घेतली सामूहिक शपथ!

आता पुन्हा एकदा एकमेकांना भिडून विजय मिळवायचाच असा पण केलेले प्रकाश सोळंके व रमेश आडसकर सध्या राज्यात दोन्ही पक्ष एकत्र असल्याने आज तरी दोघे पंकजा मुंडे यांच्यासाठी एकत्र दिसले.

(Edited by -Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com