Sambhajinagar Collector News : आस्तिककुमार पांडेय पुण्याला, स्वामी संभाजीनगरचे नवे कलेक्टर

IAS Officers Transfer Order : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक विभागाच्या सूचनेनुसार तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत
Astik Kumar Pandey - Dilip Swami
Astik Kumar Pandey - Dilip Swami Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची बदली झाली असून, पुणे येथील भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व अतिरिक्त संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी नवे जिल्हाधिकारी म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून दिलीप स्वामी यांची सात महिन्यांपूर्वीच बदली झाली होती. ते पोस्टिंगच्या प्रतीक्षेत होते. आता तब्बल 7 महिन्यांनी स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी स्वामी आपल्या पदाचा पदभार घेणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक विभागाच्या सूचनेनुसार तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या (Transfer) करण्यात येत आहेत. बुधवारी (दि.14) काही अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले असून, यामध्ये जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांचाही समावेश आहे. पांडेय यांची पुणे येथील भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Astik Kumar Pandey - Dilip Swami
Thackeray Group News : नाशिक दौऱ्यात आदित्य ठाकरेंनी उमेदवाराची घोषणाच करून टाकली?

त्यांच्या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आस्तिककुमार पांडेय (Astikumar Pandey) सध्या प्रशिक्षणासाठी मसुरी येथे असून, जिल्हाधिकारी पदाचा पदभार मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्याकडे आहे. पांडेय यांची कोठे बदली होते आणि त्यांच्या ठिकाणी कोणाची वर्णी लागते, याची उत्सुकता अनेक दिवसांपासून होती.

अनेक नावे चर्चेत होती. मात्र, दिलीप स्वामी यांचे नाव कायम आघाडीवर होते. आणि शेवटी जिल्हाधिकारी म्हणून त्यांचीच नियुक्ती झाली आहे. पांडेय यांनी 14 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हाधिकारी म्हणून संभाजीनगरचा पदभार स्वीकारला होता. आपल्या 14 महिन्यांच्या कार्यकाळात जी-20 या आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन केले, तर खंड पडलेला आंतरराष्ट्रीय वेरुळ-अजिंठा महोत्सवाला नव्याने सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारानेच दोन महोत्सव यशस्विपणे पार पडले.

मंत्रिमंडळाची बैठकही त्यांच्याच काळात झाली. असे असले तरी जिल्हाधिकारी म्हणून पांडेय यांना जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यात यश आले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाची नूतन इमारत, नवीन हुतात्मा स्मारक, घृष्णेश्वर मंदिर विकास आराखडा, पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान हे महत्त्वाचे प्रकल्प अद्यापही त्याच स्थितीत आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून तीन वर्षे काम केल्यानंतर जिल्हाधिकारी म्हणूनही ते भरीव काम करतील अशी आशा होती.

मनपासारखेच नावीन्यपूर्ण उपक्रम आणि प्रकल्प राबवतील असे वाटत होते, परंतु तसे काही झाले नाही. त्यांच्याच काळात अब्दीमंडीतील निर्वासित मालमत्तेचे हस्तांतर आणि विक्री प्रकरण वादग्रस्त ठरले असून, या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे अब्दीमंडी प्रकरणाचा तपास ज्या जमाबंदी आयुक्तांकडे सोपविण्यात आला. त्याच विभागात त्यांची अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे. हा योगायोग की दुसरेच काही, याबाबत चर्चा होत आहे.

Astik Kumar Pandey - Dilip Swami
Rajya Sabha Election : अजितदादांचा धक्कातंत्रांचा प्रयत्न फसला; 'त्या' नेत्याची पलटी अन् ऐनवेळी पटेलांना उमेदवारी

नवे जिल्हाधिकारी मराठवाड्यातलेच...

नूतन जिल्हाधिकारी स्वामी उद्या (ता.15) पदभार स्वीकारणार आहेत. विकासकामांना गती देणे, प्रश्नांची सोडवणूक करणे, यावर आपला भर असेल. प्रारंभी जिल्ह्याचा आढावा घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे. दिलीप स्वामी हे लातूर जिल्ह्यातील तोंडार येथील मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदावर त्यांची निवड झाली.

अमरावती येथे रोहयोचे उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. अमरावती येथे निवासी उपजिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी, महापालिकेच्या उपायुक्तपदी त्यांनी काम केले. त्यानंतर नांदेड जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी म्हणून सेवा बजावली. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी म्हणून बढती मिळाल्यावर त्यांनी नांदेड, मालेगाव, नाशिक विभागीय कार्यालयात उपायुक्त ( महसूल) येथे सेवा बजावली.

Astik Kumar Pandey - Dilip Swami
Kolhapur Lok Sabha : छत्रपती घराण्यालाच काँग्रेसची साथ; पण ठाकरे गटाची भूमिका गुलदस्त्यात

आयएएसपदी नॉमिनेशन प्राप्त झाल्यानंतर ते सध्या सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी 2002 मध्ये शासनाकडून गौरव सत्कार, यासह राजीव गांधी गतिमान प्रशासन स्पर्धेत अमरावती तसेच नांदेड येथे कार्यरत असतानाच पुरस्कार. तसेच कोविड काळात सोलापुरात त्यांनी राबविलेल्या माझे गाव कोरोनामुक्त गाव अभियानाची राज्यस्तरावरून दखल घेतली गेली.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Astik Kumar Pandey - Dilip Swami
Maharashtra Politics : भुजबळांच्या कट्टर समर्थकाची मोठी घोषणा; महाराष्ट्रात आणखी एका राजकीय पक्षाची एन्ट्री

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com