Atul Save CM Fadnavis: ...म्हणून मंत्री अतुल सावेंचं फडणवीसांच्या दरबारात पुन्हा वाढलं वजन; मुख्यमंत्र्यांनी महिनाभरातच दुसर्‍यांदा भरवला पेढा!

ZP Panchayat Samitee Election News : शिवसेनेचे जिल्ह्यात सहा आमदार, पालकमंत्री पद, एक खासदार असताना भाजपाने महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मिळवलेले यश ही स्थानिक नेत्यांच्या धूर्त खेळी आणि अचूक रणनीतीचे असल्याचे बोलले जाते.
Atul Save CM Fadnavis .jpg
Atul Save CM Fadnavis .jpgSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वजन वाढले आहे. महानगर पालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बिनविरोध निवडून आणल्याबद्दल देवाभाऊंनी सावे यांना शाबसकी दिली. महिनाभरात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावे यांना पेढा भरवत त्यांचे अभिनंदन केले.

शिवसेनेचे जिल्ह्यात सहा आमदार, पालकमंत्री पद, एक खासदार असताना भाजपाने महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मिळवलेले यश ही स्थानिक नेत्यांच्या धूर्त खेळी आणि अचूक रणनीतीचे असल्याचे बोलले जाते.

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत स्वबळावर 57 नगरसेवक आणि जिल्हा परिषदेत 23 सदस्य निवडून आणण्याची किमया मंत्री अतुल सावे, माजी खासदार भागवत कराड, आमदार प्रशांत बंब, अनुराधा चव्हाण, संजय केनेकर या जिल्ह्यातील भाजपाच्या धुरंधर नेत्यांनी करून दाखवली. अर्थात या यशाला घोडेबाजार, पैशाचे आमिष, धमक्या, दहशतीच्या आरोपांची काळी किनार देखील आहे. परंतु राजकारणात सगळं चालतं, या नव्या धोरणानूसार भाजपाने विरोधक आणि महायुतीतील घटक पक्षांनाही झटका दिला.

छत्रपती संभाजीनगरसह गंगापूर, खुलताबाद पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिंदेंची शिवसेना या पक्षांच्या सदस्यांनाच फोडत सभापती पदं पटकावली. 55 पंचायत समिती सदस्य शिवसेनेच्या भात्यात असताना 38 सदस्य असलेल्या भाजपाने सहा पंचायत समित्यांमध्ये सभापती केले.

Atul Save CM Fadnavis .jpg
Satara ZP President : सातारा ZP अध्यक्षा प्रिया शिंदेंच्या ओबीसी दाखल्याबाबत शशिकांत शिंदेंचा मोठा दावा; ‘आम्ही कोर्टात जाणार...’

तर शिवसेनेला फक्त तीन सभापती पदांवर समाधान मानावे लागले. अर्थात याला स्थानिक नेत्यांमधील हव्यास, कुरघोडीचे राजकारण कारणीभूत ठरले. दुसरीकडे भाजपाने मित्रपक्षांसह विरोधकांच्या तंबूत शिरत सभापती, उपसभापती पदासाठीचे संख्याबळ जमवत बाजी मारली.

ZP ही शत-प्रतिशत भाजपा..

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीत शिंदेंच्या शिवसेनेची तिरकी चाल आधीच हेरत सावे, बंब जोडीने आपले पत्ते खेळायला सुरूवात केली. भाजपाने मित्रांचीच अशी काही कोंडी केली कि, शिंदेंच्या शिवसेनेला या निवडणुकीवर बहिष्कारच टाकावा लागला. केसाने गळा कापला, विश्वासघात केला अशी दणआपट करत शिवसेनेने ताणलेला बाण अखेर सोडलाच नाही.

Atul Save CM Fadnavis .jpg
Vasant More : पुण्यात ठाकरेंना मोठा धक्का! शिवसेनेच्या बड्या नेत्यावर अटकेची टांगती तलवार, न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

या सगळ्या घडामोडीत भाजपाचे अतुल सावे, ठरल्याप्रमाणे प्लॅन यशस्वी करणारे आमदार प्रशांत बंब व इतरांनी राजकीय पटलावर शिवसेना अजूनही लिंबू-टिंबू असल्याचे दाखवून दिले. आतापर्यंत शिवसेनेच्या दबावाला बळी पडणाऱ्या भाजपाने आता आक्रमक भूमिका घेतल्याचे या निवडणुकीत पहायला मिळाले.

या यशाचे कौतुक देवाभाऊंनी मुंबईत नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना बोलावून केले. अर्थात या सगळ्या राजकीय नाट्याचे नटसम्राट ठरले ते सावे आणि बंब.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com