
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंनी काही दिवंसापूर्वी न बोलण्याची डबल सेच्युरी झाली, 200 दिवस न बोलता काढले, असं विधान करतानाच वैर माझ्याशी होतं, तर बदनामी बीड जिल्ह्याची का केली? अशा सवाल करत विरोधकांना फटकारलं होतं. पण यानंतर आता शरद पवारांच्या पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे (Bajrang Sonwane) यांनी धनंजय मुंडेंना करारा जवाब देतानाच धक्कादायक दावा केला आहे.
बीडमध्ये महादेव मुंडे हत्या प्रकरणी शुक्रवारी (ता.1ऑगस्ट) सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. याच बैठकीत मनोज जरांगे यांनी आठ दिवसांत महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक केली नाही, तर बीड बेमुदत बंद राहणार, असा इशारा दिला आहे.याचदरम्यान,आता बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनीही बीड जिल्ह्यातील परळीबाबत खळबळजनक दावा केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील लष्कर-ए- तोयबापेक्षाही भयानक संघटना परळीत आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय लष्कर ए तोयबापेक्षाही भयानक संघटना परळीत आहे. पण याच्यावर आम्ही बोललं की, माझ्या मातीला बदनाम करु नका, माझ्या जातीला बदनाम करू नका. इतकी नौटंकी असा जोरदार प्रहार बजरंग सोनावणे यांनी धनंजय मुंडेंवर केला. असल्याचं सोनवणे म्हणाले आहेत.
सोनावणे म्हणाले, संगीत डिगोळे असेल किंवा किशोर फड... 40 खून या परळीत झालेत. याची साधी नोंदसुध्दा नाही. तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि कर्तृत्वानं हे चार खून फक्त उघडकीस आलेत,असंही खासदार सोनावणे यांनी सांगितलं.
बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणात पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आणि पुढच्या काही तासांतच पाच संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं आहे. महादेव मुंडेंची निर्घृणपणे हत्या होऊन तब्बल 21 महिने उलटले आहेत. त्यानंतर ही पहिलीच कारवाई झाली आहे. तसंच संशयित आरोपी गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक रवाना झाले आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट घालून दिल्याचं ज्ञानेश्वरी मुंडेंनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ज्ञानेश्वरी मुंडेंचं म्हणणं ऐकून घेतलं. एसआयटीकडे तपासही दिला.पण ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटू नयेत म्हणून धनंजय मुंडेंनी प्रयत्न केले, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला.
एका प्रकरणात माझ्यासह बीड जिल्ह्याची 200 दिवस बदनामी केली असं धनंजय मुंडे म्हणाले होते. त्याला खासदार बजरंग सोनवणे यांनी उत्तर दिलं आहे. धनंजय मुंडेंची नौटंकी असून लष्कर ए तोयबापेक्षा भयानक संघटना परळीत असल्याचं सोनवणे म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये नुकताच निर्धार मेळावा झाला. या मेळाव्यात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली होती. मुंडे यांनी यावेळी बऱ्याच दिवसांनी मी बोलतोय. न बोलण्याची डबल सेच्युरी झाली, 200 दिवस न बोलता काढले असेही धनंजय मुंडे म्हणाले. या दोनशे दिवसांमध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या, त्यापैकी एक गोष्ट मला नक्कीच जिव्हारी लागल्याचंही सांगितलं होतं.
या दोनशे दिवसांत माझ्या मुला-बाळांची बदनामी झाली. तसेच दोनदा मरता मरता वाचलो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं असंही मुंडे यांनी म्हटलं.पण आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी. ज्यांनी कोणी केली, भलेही तो बीडच्या मातीतला असेल, बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल, त्यांना एवढंच सांगायचं वैर जर माझ्याशी होतं, तर माझ्या या मातीची बदनामी का? असा घणाघातही मुंडे यांनी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.