

Beed News: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमधून एक हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांतच अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी येथे एका तरुणानं टोकाचं पाऊल उचललं आहे. गळफास घेऊन संबंधित तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
चंद्रपूर महसूल विभागात तलाठी म्हणून गणेश दत्तू कोळी हे कार्यरत होते. तर त्यांची पत्नी अंबाजोगाई येथे अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात फॉरेन्सिक विभागात ड्युटीवर आहेत. हे नवदांपत्य अंबाजोगाईतील लग्नानंतर मोरेवाडी येथे भाड्याच्या खोलीत राहायला होते.
तलाठी गणेश दत्तू कोळी यांनी पत्नी ड्युटीवर गेल्यावर खोलीतील लोखंडी हुकाला दोरीच्या सहाय्यानं गळफास घेतला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. आत्महत्येमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच त्यांनी गणेश कोळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. बीड जिल्ह्यातील या घटनेचा अंबाजोगाई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
चंद्रपूर महसूल विभागात कंत्राटी पध्दतीनं तलाठी पदावर कार्यरत असलेल्या गणेश कोळी यांनी लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांतच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. पण या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांकडून पंचनामा केल्यानंतर तसेच शव विच्छेदन पार पडल्यानंतर गणेश कोळी यांचा मृतदेह नातेवाईंकांच्या ताब्यात दिला. मात्र, या घटनेमुळे कोळी आणि त्यांच्या पत्नी अशा दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.