IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी आयुक्तपदाचा 'चार्ज' घेताच भेसळखोरांना पहिला दणका; 48 तासांत 'FDA'च्या तीन मोठ्या कारवाया

FDA Action: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारताच पुढील 48 तासांतच धडक मोहीम राबवली आहे. त्यांच्या विभागानं केलेल्या तीन मोठ्या कारवाया समोर आल्या आहेत.
Tukaram Mundhe Narhari Zirwal
Tukaram Mundhe Narhari Zirwal sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: आपल्या धडाकेबाज निर्णयांनी प्रशासनात आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचा मोठा दरारा आहे. त्यांची काही दिवसांपूर्वीच मुंढेंची 21 वर्षांच्या प्रशासकीय सेवेतील 25 वी बदली राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी झाली आहे.त्यांनी आयुक्तपदाचा चार्ज घेतल्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळांची भेट घेतली होती.यानंतर आता मुंढेंनी आपल्या नेहमीच्या स्टाईलनं कामाला सुरुवात करताना कारवाईचा तडाखा देण्यास सुरूवात केली आहे.

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारताच पुढील 48 तासांतच धडक मोहीम राबवली आहे. त्यांच्या विभागानं केलेल्या तीन मोठ्या कारवाया समोर आल्या आहेत. पुणे, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या कारवाया या भेसळखोरांसाठी मोठा इशारा मानला जात आहे.

राज्याच्या अन्न व औषध विभागानं भेसळयुक्त पुणे जिल्ह्यातील निमगाव केतकी,धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा आणि छत्रपती संभाजीनगर येथे अन्नपदार्थ विक्रेते,निकृष्ट दर्जाचे तूप व खवा उत्पादकांसह रसायनांच्या सहाय्यानं फळं पिकवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

आयुक्त तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वातील 'एफडीए' अ‍ॅक्शन मोडवर आल्याचं दिसून येत आहे. या कारवायानंतर राज्याचं अन्न व औषध प्रशासन विभाग पुढील काही दिवसांत राज्यभरात भेसळखोरांविरोधात मोठी मोहीम हाती घेणार असल्याचं हे संकेत मानले जात आहेत.

Tukaram Mundhe Narhari Zirwal
DK Shivakumar: कर्नाटकचं 'सीएम'पद खेचून आणलेले काँग्रेसचे 'संकटमोचक'च कधीकाळी आलेले अडचणीत; 52 दिवस जेलमध्ये होता मुक्काम

तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी( ता.२६ मे) एफडीच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता. यानंतर पहिल्याच दिवशी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात मोठी कारवाई करण्यात आली होती. निमगाव केतकी येथे रसायनांचा वापर करून कृत्रिमरीत्या पिकवण्यात आलेले तब्बल 800 किलो आंबे एफडीएकडून जप्त करण्यात आले आहेत. या आंब्यांची किंमत सुमारे 20 हजार रुपये आहेत. विभागाला याबाबतची माहिती मिळताच ही कारवाई करण्यात आली.

दुसरीकडे मराठवाड्याची राजधानी संबोधले जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथेही त्याचदिवशी FDA अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छापेमारीत विक्रीसाठी ठेवलेले तब्बल 40 हजार 960 रुपयांचे निकृष्ट दर्जाचे गायीचे तूप जप्त केले आहेत. एफडीएकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Tukaram Mundhe Narhari Zirwal
Vidhan Parishad Election : नाराज प्रफुल पटेलांचा खंदा समर्थक राष्ट्रवादीला देणार धक्का; विधान परिषदेसाठी कमळ हाती घेणार

तर बुधवारी 27 मे रोजी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे तब्बल 215 किलो निकृष्ट दर्जाचा खवा जप्त करण्यात आला. हा खवा साधारण 47 हजार 300 रुपयांचा असल्याची माहिती समोर येत आहे.या प्रकरणी एकूण 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या तीन कारवायांमधून एकप्रकारे भेसळयुक्त, निकृष्ट आणि आरोग्यास अपायकारक अन्नपदार्थ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराच भेसळखोरांना दिल्याचं दिसून येत आहे. गेली काही महिने सातत्यानं लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर कठोर आणि कायमस्वरूपी कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी केली जात होती.

Tukaram Mundhe Narhari Zirwal
Siddaramaiah vs DK Shivakumar : राजीनामा देण्याच्या काही तास आधीच सिध्दरामय्यांची तिरकी चाल; संकटमोचक शिवकुमार यांची वाट बिकट, पहिलं आव्हान...

FDA विभागाकडून पुणे,छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यांत करण्यात आलेली ही कारवाई राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे त्यांच्या शिस्तप्रियता, बेधडक निर्णय आणि पारदर्शक कारभारासाठी ओळखले जातात.

त्यांनी यापूर्वी प्रशासकीय पातळीवर अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करताना त्या त्यावेळी भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांना प्रतिबंध करण्यासंबंधी कठोर भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. आता त्यांच्या FDA विभागात झालेल्या नियुक्तीनंतर बनावट औषधे, अन्नभेसळ, परवाने आणि ऑनलाइन औषध विक्रीतील गैरव्यवहारांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com