Video Beed Firing : बीड हादरलं! सरपंचाची गोळ्या झाडून हत्या, बबन गित्तेंसह पाच जणांवर गुन्हा दाखल; कारण काय?

Beed Firing News : बीडमध्ये झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू आणि एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
baban gitte bapu andhale
baban gitte bapu andhale sarkarnama

बीडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. बीडमध्ये गोळीबार झाला असून यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर बीडमध्ये ( Beed ) खळबळ उडाली आहे.

जखमी व्यक्तीवर अंबाजोगाई येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबारानंतर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत.

बीडच्या परळीत शनिवारी रात्री गोळीबार ( Firing ) झाला. यात मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे जागीच ठार झाले आहेत. तर, ग्यानबा गित्ते गंभीर जखमी झाले आहेत. शहरातील बँक कॉलनीत ही घटना घडली आहे. गोळीबारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सध्या जखमीवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

baban gitte bapu andhale
Kundlik Khande News : मुंडे समर्थकांनी कार्यालय फोडल्यानंतर कुंडलिक खांडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

या घटनेनंतर बीडचे पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट दिली. सध्या ते परळीत ठाण मांडून आहेत. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाचे नेते, बबन गित्ते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून हा गोळीबार झाल्याचं 'एफआयआर'मध्ये नमूद करण्यात आलं आहे.

baban gitte bapu andhale
Kundlik Khande Arrested : बीडमधील व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी चर्चेत असलेल्या कुंडलिक खांडे यांना अटक, कारण काय?

दरम्यान, गोळीबारानंतर परळीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मृत बापू आंधळे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याची माहिती मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com