Beed Hostel Scam: बीडमध्ये वसतिगृह घोटाळ्याचा पर्दाफाश! मुख्याध्यापकानं विद्यार्थ्यांचा...; काय आहे प्रकरण?

Beed Hostel Scam: बीड जिल्हा हा राज्यात गुन्हेगारी कृत्यांचा अड्डा बनल्यासारखी स्थिती बनली आहे. आधीच संतोष देशमुख प्रकरणामुळं बदनमा झालेल्या बीडमध्ये आता नवा वसतिगृह घोटाळा समोर आला आहे.
crime News
crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed Hostel Scam: बीड जिल्हा हा राज्यात गुन्हेगारी कृत्यांचा अड्डा बनल्यासारखी स्थिती बनली आहे. आधीच संतोष देशमुख प्रकरणामुळं बदनमा झालेल्या बीडमध्ये आता नवा वसतिगृह घोटाळा समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणात गुरुस्थानी मानल्या जाणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकानंच मोठा भ्रष्टाचार केला आहे. वसतिगृहाच्या नावाखाली या मुख्याध्यापकानं लाखोंचा शासकीय निधी गिळंकृत केला आहे.

crime News
Supreme Court judgment : 'त्या' सर्व महिलांना मातृत्व रजा मिळायलाच हवी; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, लाखो महिलांना फायदा होणार!

नेमकं प्रकरण काय?

बीडमधील एका शाळेच्या मुख्याध्यापकानं असं लिहून दिलंय की, आमच्याकडं वसतिगृह नाही, तरीपण त्या वसतिगृहाच्या नावानं या मुख्याध्यापकानं शासकीय बिलं उचलली आहेत. केज तालुक्यात २९ वसतिगृह आहेत त्या वसतिगृहावर १०० विद्यार्थी असतील तर २०० ते २५० विद्यार्थी असल्याचं दाखवून त्यांनी शासकीय बिलं उचलली आहेत, असा आरोप तक्रारदार बाबुराव म्हस्के यांनी केला आहे.

crime News
Deepak Dalvi : सीमाप्रश्न जिवंत ठेवणारा वाघ हरपला : महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे निधन

बनावट बिलं काढल्याचा प्रशासनाचा दुजोरा

काही तक्रारी माझ्यासमोर आल्या आहेत, विद्यार्थी संख्या नसतानाही अधिकची रक्कम घेतलेली आहे असं तक्रारीचं स्वरुप आहे. त्यासाठी आपल्या यंत्रणा देखील आहेत, जानेवारी महिन्यात क्रॉस तपासणी करुन देखील आपण पैसे वाटप केले होते. याप्रकरणात जर चुकीचं काही घडलं असेल तर शंभर टक्के संबंधित अधकाऱ्यावर कारवाई होईल, असं आश्वासनं या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बीड जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com