Kala Kendra Firing : कला केंद्रात पुन्हा राडा : 2 गटात तुंबळ हाणामारी; गोळीबाराचीही चर्चा, पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न?

Kala Kendra Firing : काही दिवसांपूर्वी दौंड येथील कला केंद्रात गोळीबार झाला होता. त्यानंतर आता धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्रासमोरील मारहाणीत गोळीबार झाला आहे.
Violent incidents at cultural centers in Chaufula and Kalamb spark outrage as shooting videos surface and allegations of cover-up emerge.
Violent incidents at cultural centers in Chaufula and Kalamb spark outrage as shooting videos surface and allegations of cover-up emerge.Sarkarnama
Published on
Updated on

Kala Kendra Firing : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील चौफुला येथील अंबिका कला केंद्र गोळीबार प्रकरण अद्याप ताजे आहे. अशात आणखी एका कला केंद्रात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्रासमोर झालेल्या मारहाणीत गोळीबार झाल्याचे सांगितले जाते. सदर घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असतानाही गोळीबाराचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी (4 ऑगस्ट) चोराखळी येथील महाकाली कला केंद्रसमोर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. यात गोळीबार झाल्याचा प्रकार घडला होता. याचा व्हिडीओही परिसरात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण दौंडप्रमाणाचे हे प्रकरणही दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. दोन्ही गटांकडून देण्यात आलेल्या फिर्यादीमध्ये गोळीबाराचा उल्लेख करण्यात आला नाही. पोलिसांनीही या प्रकरणात गोळीबाराचा उल्लेख केलेला नाही.

या प्रकरणी हाणामारी आणि जीवे मारण्याची धमकी अशी परस्परांविरुद्ध तक्रार देण्यात आली. त्यानुसार 9 जणांसह इतर अनोळखी 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण यात गोळीबाराचा उल्लेख टाळण्यात आला आहे. तपासाचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून पोलिसांनीच गोळीबार प्रकरण दाबल्याच्या चर्चेला परिसरात उधाण आले आहे. या हाणामारीमध्ये 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर धाराशिव येथील शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Violent incidents at cultural centers in Chaufula and Kalamb spark outrage as shooting videos surface and allegations of cover-up emerge.
Daund Firing News : सुपारीच्या खंडाचही व्यसन नाही, गळ्यात तुळशीची माळ; तरी आमदार मांडेकरांचे 'भाऊ' दौंडच्या कला केंद्रात कसे पोहचले?

आणखी एका वादावादी प्रकरणात गुन्हा नोंद :

वडगाव (ज.) येथील गौरी लोकनाट्य कला केंद्रातही वादावादीचा प्रकार उघडकीस आला आहे. 30 जून रोजी घडलेल्या या घटनेत धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. आळणी येथील रहिवासी फिर्यादी बालाजी नानासाहेब भराडे यांना कला केंद्राबाहेर शांतीलाल सायबा पवार, सुनील सायबा पवार, रमेश सायबा पवार यांनी शिवीगाळ करून मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिली. तसेच वाहनाचे नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com