Beed Loksabha : 'संविधान वाचवण्यासाठी संसदेत जाणार', बजरंग सोनवणेंना विजयाचा आत्मविश्वास

Bajrang Sonwane : आपणाला शरद पवार यांनी मोठ्या विश्वासने उमेदवारी दिली असून सर्व घटकांची साथ पाहता आपण निश्चित खासदार होणार, असा विश्वास बजरंग सोनावणे यांनी व्यक्त केला.
Bajrang Sonwane Lok Sabha campaign
Bajrang Sonwane Lok Sabha campaign sarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : शक्तिप्रदर्शन करत नुकताचा बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. लोकसभेच्या प्रचार महायुती महाविकास आघाडीकडून जोरदारपणे करण्यात येतो आहे. महाविकास आघाडीकडून भाजपचा चारसौ पारचा नारा हा संविधान बदलण्यासाठी आहे, असा दावा केला जातो आहे. त्याच मुद्याला धरून 'मी बीड जिल्ह्याचा खासदार होऊन संविधान वाचविण्यासाठी संसदेत जाणार आहे.', असा विश्वास राष्ट्रवादी बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला.

Bajrang Sonwane Lok Sabha campaign
Loksabha Election 2024 : प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, ते मनोरुग्ण झालेत, त्यांच्यावर राऊतांचा परिणाम...

बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) म्हणाले, संविधान वाचविण्यासाठी आपण संसदेत जाणार आहोत. सर्वसामान्य सर्वच घटकांची साथ मिळत आहे. विविध घटकांना टार्गेट करणाऱ्या पक्षाला आता जागा दाखविण्यासाठी सामान्यांचा हुंकार पेटला आहे. आपणाला शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठ्या विश्वासने उमेदवारी दिली असून सर्व घटकांची साथ पाहता आपण निश्चित खासदार होणार.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बीड येथील श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकुलावर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आदर्श शिंदे यांच्या बहारदार गीत गायनाचा कार्यक्रम झाला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पुढाकाराने झालेल्या कार्यक्रमाला या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे उपस्थित होते.

तसेच संदीप क्षीरसागर, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, माजी आमदार उषा दराडे, माजी आमदार सय्यद सलिम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर सातपुते, गणेश वरेकर यांच्या हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com