Religious Conversion Pressure Allegations : बीड हादरलं! विनयभंग प्रकरणात ट्विस्ट, अत्याचार झाल्याचा पीडितेचा जबाब, व्हिडिओ दाखवत धर्मांतरासाठी दबाव

After the assault of a schoolgirl in Majalgaon, Beed district, the accused allegedly filmed the incident and pressured her for religious conversion, sparking serious concerns : बीड माजलगावमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचाराचा व्हिडिओ बनवून धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा प्रकार समोर आला आहे.
Beed Majalgaon case
Beed Majalgaon caseSarkarnama
Published on
Updated on

Beed Majalgaon case : बीडच्या माजलगावमधील विद्यार्थिनीच्या विनयभंगाला वेगळं वळण लागलं आहे. या विद्यार्थिनीवर अत्याचार झाला असून, त्याचा व्हिडिओ दाखवून, तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणला जात, असल्याचा प्रकार समोर आला आहे.

पीडितेचे संबंधितांबरोबर झालेल्या व्हिडिओ चॅटिंग आढळले असून, यात तसे तपासात समोर येत आहे. याशिवाय संबंधिताने, अशापद्धतीने पाच ते सहा मुलींना वेठीस धरल्याची चर्चा आहे.

बीडच्या (Beed) माजलगावमधील विनयभंगप्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. माजलगावात विद्यार्थिनीवर अत्याचार करून, तिचा व्हिडिओ बनवून, धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचं समोर आलं आहे. पूर्वीच्या दाखल गुन्ह्यात अत्याचाराचे कलम वाढवण्यात आले आहे. व्हिडिओ चॅटिंगमधून हा प्रकास समोर आला आहे.

माजलगाव शहरातील कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची घटना घडली होती. या घटनेला आता नवे वळण मिळालं आहे. या प्रकरणात पीडितेने न्यायालयात (Court) जबाब नोंदवला आहे. आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात उडून तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

Beed Majalgaon case
Amravati scandal : 180 हिंदू मुलींच्या शोषणाचा दावा पेटला; समाजात अराजकता माजवण्याचा प्रकार, बोंडे-राणा-कुलकर्णींनी माफी मागावी, अलीम पटेल संतप्त

धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने पीडितेचा व्हिडिओ बनवून तिला धर्मांतरासाठी दबाव टाकल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक टिसीएस पॅटर्नची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे. माजलगाव तालुक्यातील 16 वर्षीय पीडिता 11वीचे शिक्षण घेते. 20 एप्रिलला तिच्या एका मैत्रिणीने प्रॅक्टिकल बुक नेले होते. ते परत देण्यासाठी मैत्रिणीने तिला बेकर्स लॉज कॅफेमध्ये बोलावले.

Beed Majalgaon case
Palghar case : लव जिहादचा धक्का! बीडमधील दोन मुलांच्या बापानं ‘हिंदू’ बनून युवतीला फसवलं

तिथे गेल्यावर पीडितेची मैत्रीण नव्हती. मात्र त्याच महाविद्यालयात शिकणारा इंदिरानगर भागातील अब्दुल नावाचा व्यक्ती तिथे होता. त्याने पीडितेशी गैरवर्तन केले. सुरवातीला या घटनेत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. पण पीडितेने न्यायालयात दिलेल्या जबाबत अत्याचाराची माहिती दिली.

पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला असून सायबर पोलिसांच्या मदतीने केलेल्या तपासणीत पीडितेचे असलेले व्हिडिओ आणि संबंधिताचे whatsapp चॅटिंग आढळले आहे. आरोपीने पीडितेवर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचेही त्या चॅटिंगवरून समोर आले आहे.

सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद मुंडे यांनी, अगोदर विनयभंग आणि आता अत्याचाराचे कलम वाढवण्यात आले आहे. या प्रकरणात व्हिडिओ चॅटिंगबाबत सर्व माहिती तपास अधिकारी यांच्याकडे आहे, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com