

Ashok Kharat case update Maharashtra politics: राज्यमंत्री मंडळाची बैठक बुधवारी होत असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत दोन महत्वपूर्ण विषयावर चर्चा होणार असल्याचे पुढे आले आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांचा व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे विरोधकांकडून आरोप करण्यात आले आहेत.
त्यामुळे त्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे या बैठकीला मंत्री नरहरी झिरवळ गैरहजर आहेत. तर दुसरीकडे सध्या राज्यभर गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर चर्चा होणार असल्याचे समजते.
बुधवारी होत असलेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर आणि विशेषतः अशोक खरात प्रकरणावर चर्चा होणार आहे. मात्र, या बैठकीला मंत्री नरहरी झिरवाळ उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्या या अनुपस्थितीला त्यांच्या संदर्भात व्हायरल झालेल्या एका कथित 'व्हिडीओ' क्लिपशी जोडले जात आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओची सत्यता पडताळून पहिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
त्यापूर्वी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी व्हायरल झालेल्या एका कथित 'व्हिडीओ' क्लिपशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट करीत हा व्हिडिओ दोन तीन व्हिडिओची मोडतोड करून तयार करण्यात आला असल्याचा दावा करून त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र, दुसरीकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीला अडचणीत आलेल्या मंत्री झिरवळांनी दांडी मारली आहे.
भोंदूबाबा अशोक खरातचे एकानंतर एक कारनामे उघड होत आहेत. त्याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करत काही जणांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे एसआयटी चौकशीत पुढे आले आहे. खरातचे नेते, सेलिब्रिटींशी असलेले संबंध आणि त्याचे धक्कादायक कारनामे एसआयटीच्या तपासात समोर येत आहेत, ज्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
खरातशी असलेल्या जवळीकतेमुळे एकीकडे रुपाली चाकणकर यांच्यावर टांगती तलवार असून त्यांना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्षपदही गमवावं लागले. तसेच आणखीही काही नेत्यांवर विरोधकांनी आरोप केले आहेत.
एकंदरच करात प्रकरणामुळे राज्यातील काही नेते, राजकारणी अडचणीत सापडले असून त्यांना चांगलाच घाम फुटला आहे. त्यातच आता या विषयावर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीतही चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.