Beed News : बीड नगरपालिकेच्या राजकारणात ट्विस्ट; उपनगराध्यक्षपदाचा धक्का देण्यासाठी क्षीरसागर नवा डाव टाकणार, गेम फिरणार?

Kshirsagar Family Politics: मागच्या वेळी क्षीरसागरांतील फुटीनंतरही नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदे त्यांच्याच घरात होते. यावेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भाजपकडून डॉ. सारिका क्षीरसागर यांच्या उपनगराध्यक्षपदासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा युतीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
Beed Local Body Election Result
Beed Local Body Election ResultSarkarnama
Published on
Updated on

Local Body Election Result : बीड नगरपालिका क्षीरसागर मुक्त करण्याची भाषा निवडणुकी दरम्यान करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या भाषणातून क्षीरसागर यांच्या पस्तीस वर्षाच्या कारभारावर टीकेची झोड उठवली होती. जे पस्तीस वर्षात झाले नाही ते पाच वर्षात करून दाखवण्याचा वादा बीडकरांना केला. त्यावर विश्वास ठेवत बीडकरांनी नगराध्यक्ष पदासह सर्वाधिक जागा त्यांच्या पक्षाला दिल्या.

क्षीरसागरांच्या नगरपालिकेतील वर्चस्वाला हा मोठा धक्का होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने क्षीरसागरमुक्तीसाठी शिंदेंची शिवसेना,मेटेंच्या शिवसंग्राम, रिपाइंची मदत घेतली. तर आमदार संदीप क्षीरसागर आणि भाजपसोबत लढणाऱ्या योगेश क्षीरसागर यांना काही जागा राखण्यात यश मिळाले.

क्षीरसागर मुक्त नगरपालिकेच्या दाव्या संदर्भात जेव्हा भाजपच्या सारिका क्षीरसागर यांना माध्यमांनी छेडले, तेव्हा त्यांनी आमच्या नगरसेवकांची संख्या आणि आमचे दीर संदीप क्षीरसागर यांचे नगरसेवक पाहता नगरपालिका कुठे क्षीरसागर मुक्त झाली, आम्ही आहोतच की? असे म्हणत सूचक संदेश दिला. आता उपनगराध्यक्ष पदासाठी दोन्ही क्षीरसागरांमध्ये युती होणार का? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असली तरी आता उपनगराध्यक्षपद आणि विषय समिती सभापतिदासाठी लागणाऱ्या नगरसेवकांचे पुरेसे संख्याबळ त्यांच्याकडे नाही. त्यामुळे आता एकमेकांच्या विरोधात लढलेले राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप एकत्र येतील का, क्षीरसागर भावंडे एकत्र येत अर्धी सत्ता काबीज करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Beed Local Body Election Result
BJP News: मंत्रिपदासाठी ऐनवेळी डावललेल्या मुनगंटीवारांचा भाजपात 'एकनाथ खडसे' होणार? विदर्भातील नेत्याचं मोठं विधान

बीड नगरपालिकेच्या निकालाने अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. निवडणुकीत राष्ट्रवादीवर डाव आणि पंडितांना चेक देण्याचा डॉ. क्षीरसागरांचा फासा उलटा पडला. यामुळे पंडितांना बीडच्या राजकीय वर्तुळात पाय ठेवायला वाव अन् निकालामुळे पंडितांचे पाय आणखीच घट्ट रोवले गेले. दरम्यान, निवडणुकीत आमदार विजयसिंह पंडितांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व शिवसंग्रामच्या प्रेमलता पारवे नगराध्यक्ष झाल्या अन् सर्वाधिक 19 जागा जिंकल्या.

सोबतच्या शिवसेनेचेही तीन नगरसेवक विजयी झाले. भाजपनेही डॉ. योगेश क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली चांगले यश मिळवित 15 जागा जिंकल्या. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. ज्योती घुंबरे दुसऱ्या स्थानावर राहिल्या. आमदार संदीप क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कामगिरी निराशाजनक राहिली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) एका जागेवर जिंकली.

Beed Local Body Election Result
Rahuri Assembly Constituency Election : राहुरी विधानसभेसाठी निवडणूक आयोगाची लगबग; शिवाजी कर्डिलेंच्या जागी कोण? अक्षयला संधी की, सुजयला? तनपुरेंच्या भूमिककडे लक्ष?

काँग्रेस व एमआयएमनेही एकेक जागा जिंकली आहे. दरम्यान, उपनगराध्यक्षपद आणि विषय समित्यांसाठी 27 नगरसेवकांचे संख्याबळ गरजेचे असून ते कोण्याही एक पक्ष किंवा एकत्र लढलेल्या पक्षांकडे नाही. त्यामुळे सदर पदासाठी आता तीनही पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

मागच्या वेळी क्षीरसागरांतील फुटीनंतरही नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदे त्यांच्याच घरात होते. यावेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भाजपकडून डॉ. सारिका क्षीरसागर यांच्या उपनगराध्यक्षपदासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा युतीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

Beed Local Body Election Result
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंनी लक्ष घातलं अन् गेमचं फिरला; मदन भोसलेंनी मकरंद आबांना घराच्या मैदानात दाखवलं आस्मान

दरम्यान, दोन्ही क्षीरसागर एकत्र ही प्रतिमा संदीप क्षीरसागरांच्या भावी राजकारणासाठी तोट्याची ठरू शकते. त्यामुळे अजित पवार जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने शहराच्या विकासासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबत.. अशी भूमिका ते घेऊ शकतात, अशा अटकळीही बांधल्या जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com