Sandeep kshirsagar : अजित पवारांकडे पाहून तुम्हाला सत्ता दिली; भ्रमात राहू नका जनता धडा शिकवेल; संदीप क्षीरसागर यांचा पंडितांना इशारा!

Sandeep Kshirsagar targets News : बीड नगरपालिकेची जबाबदारी तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी विजयसिंह पंडित यांच्यावर टाकल्यानंतर त्यांनी शहरात बारकाईने लक्ष द्यायला सुरुवात केली.
Vijaysinha Pandit, Sandip Kshirsagar.
Vijaysinha Pandit, Sandip KshirsagarSarkarnama
Published on
Updated on

Beed politics : बीड नगरपालिका निवडणुकीपासून शहराच्या व जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झालेले गेवराईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार विजयसिंह पंडित आणि बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यात अधूनमधून खटके उडत असतात. बीड नगरपालिकेची जबाबदारी तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी विजयसिंह पंडित यांच्यावर टाकल्यानंतर त्यांनी शहरात बारकाईने लक्ष द्यायला सुरुवात केली.

बीड विधानसभा मतदारसंघात पंडित यांचा वाढता हस्तक्षेप आमदार संदीप क्षीरसागर यांना खटकत होता. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमकी घडल्याची अनेक उदाहरणे देखील आहेत. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर निशाणा साधत त्यांना नाव न घेता इशारा दिला आहे.

बीडच्या नगरपालिकेत जनतेने तुम्हाला दिवंगत लोकनेते अजित पवार यांनी दिलेल्या विकासाच्या शब्दावर सत्ता दिली आहे. पण तुम्ही अपयशी ठरला आहात, तुम्ही ज्या भ्रमात आहात त्या भ्रमात राहू नका ही जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराच संदीप क्षीरसागर यांनी आमदार विजयसिंह पंडित यांना दिला आहे.

Vijaysinha Pandit, Sandip Kshirsagar.
Karad BJP : ऐतिहासिक सत्तांतर! कराड पंचायत समितीवर भाजपचा झेंडा : दोन्ही राष्ट्रवादीवर आत्मचिंतनाची वेळ, काँग्रेसचा दिवा विझण्याच्या मार्गावर

बीड नगरपरिषदेच्या कारभारावरून आणि शहर विकासाच्या ठरावावरून उफाळलेला राजकीय वाद आता अधिक पेटला आहे. सत्ताधारी नगरसेवकांमधील पक्षांतर्गत मतभेद आणि राड्यानंतर आता बीडच्या राजकारणात आमदारांमध्येच थेट कलगीतुरा रंगला आहे. या वादात बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत, नाव न घेता आमदार विजयसिंह पंडित यांना इशारा दिल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.

बीडचा मतदार स्वाभिमानी..

मला कोणाचे नाव घ्यायचे नाही, पण बीड हा स्वाभिमानी मतदारसंघ आहे. कोणीही कोणत्याही भ्रामक अविर्भावात राहू नये. बीडची सुज्ञ जनता वेळ आली की बरोबर धडा शिकवेल, अशा शब्दांत आमदार संदीप क्षीरसागर यांनी पंडित यांना टोला लगावला. क्षीरसागरांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील अंतर्गत राजकीय संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. ​नगरपालिकेतील विकासकामांच्या ठरावांवरून सुरू असलेला हा वाद केवळ नगरसेवकांपुरता मर्यादित न राहता आता वरिष्ठांच्या पातळीवर पोहोचला आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर कुणाचाही वचक राहिलेला नाही. अशावेळी लोकप्रतिनिधींमधील या शाब्दिक युद्धाने बीडच्या राजकारणातील वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी काळात हा गटबाजीचा खेळ आणि दोन्ही राष्ट्रवादींमधील हा संघर्ष कोणता नवा अध्याय लिहिणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Vijaysinha Pandit, Sandip Kshirsagar.
​Beed municipal council : बीड नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादीला झेपेना; सत्ताधारीच एकमेकांवर तुटून पडले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com