Beed NCP News : बीडच्या गडात शिवसेनेचा सिंह कशी डरकाळी फोडणार? राष्ट्रवादीकडून कुरघोडी अन् गटबाजीचं आव्हान

Assembly Election 2024 : एकेकाळी भाजप - शिवसेना युतीत जिल्ह्यात शिवसेना (Shivsena) मोठा भाऊ होता. त्यावेळी विधानसभा सात मतदारसंघ (रेणापूरसह) असलेल्या जिल्ह्यात चार जागा शिवसेनेला तर तीन जागा भाजपला असत.
Beed Politics
Beed PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Beed News : महायुतीत शिवसेनेच्या वाट्याच्या एकमेव बीड विधानसभा मतदार संघावर दावा ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने कुरघोडी केलेली असतानाच पुन्हा शिवसेनेत ऐन निवडणुकीच्या तोंडावर गटबाजी उफाळून आली आहे. विशेष म्हणजे युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनीही मेळाव्यात गटबाजीवर भाष्य केले.

जिल्हाप्रमुख अनिल जगताप लढण्यासाठी मतदारसंघात मशागत करत असतानाच आता युवासेनेचे मराठवाडा पदाधिकारी बाजीराव चव्हाण यांनी निवडणुकीत पेरणी करण्याची तयारी चालवली आहे. अगोदरच राजकीय ताकद मर्यादित असलेल्या शिवसेनेत आता गटबाजी उफाळल्याने बीडच्या (Beed) गडात शिवसेनेचा सिंह कशी डरकाळी फोडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

एकेकाळी भाजप - शिवसेना युतीत जिल्ह्यात शिवसेना (Shivsena) मोठा भाऊ होता. त्यावेळी विधानसभा सात मतदारसंघ (रेणापूरसह) असलेल्या जिल्ह्यात चार जागा शिवसेनेला तर तीन जागा भाजपला असत. पुढे भाजप शिवसेनेच्या जागा वाटपात मुंबई किंवा कोकणातील जागा शिवसेनेला देत जिल्ह्यातील शिवसेनेची एकेक जागा भाजपने पदरात पाडून घेतल्या आणि शिवसेनेचा सिंह एकट्या बीड मतदारसंघाच्या पिंजऱ्यात कोंडला.

शिवसेनेकडून जिल्ह्यातून प्रा. सुरेश नवले यांनी मंत्रिपद तर प्रा. सुनील धांडे यांनी तसेच पक्षाच्या पाठिंब्यावर बाजीराव जगताप, साहेबराव दरेकर, बदमराव पंडित विधिमंडळात पोचले.

Beed Politics
Pune NCP News : पुण्यात राष्ट्रवादीत ना'राजीनामा' सत्र सुरूच; आतापर्यंत अनेक पदाधिकाऱ्यांनी पद सोडले!

दरम्यान, युती आणि महायुतीत देखील विधानसभेला बीडची जागा शिवसेनाच लढवते. परंतु, मागच्या वर्षी महायुतीत राष्ट्रवादी सहभागी झाल्यानंतर मात्र शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सुरू केले आहेत. ज्यांचा आमदार त्यांचा उमेदवार असे सूत्र मांडून बीडच्या जागेवर राष्ट्रवादीने दावा ठोकला आहे.

मागच्या निवडणुकीत बीडमधून राष्ट्रवादीकडून विजयी झालेले संदीप क्षीरसागर भलेही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार काँग्रेसमध्ये असले तरी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या समीकरणाचा पुनरुच्चार करून शिवसेनेला अस्वस्थ केले आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्याकडून दोन वर्षांपासून लढण्याची तयारी सुरू आहे. संपर्क दौरे, पक्षाच्या अजेंड्यावरील कार्यक्रम, विविध स्पर्धा व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ते मतदारसंघात पेरणी करत आहेत. 40 वर्षांपासून शिवसेनेत आणि 20 वर्षांपासून जिल्हाप्रमुख असा त्यांचा अनुभव आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनातही जगताप कायम पुढे असतात.

Beed Politics
Imtiaz Jaleel News : `नांदेड से हमारा पुराना कनेक्शन`, इम्तियाज जलील पोटनिवडणुक लढणार!

आता या स्पर्धेत युवासेनेचे बाजीराव चव्हाण देखील उतरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अशी ओळख असलेले चव्हाण यांनी शेकडो रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून दिली आहे. तरुणांची एक फळी त्यांच्या मागे आहे. त्यामुळे त्यांनीही आता उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे.

परवा त्यांनी युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या उपस्थितीत घेतलेल्या मेळाव्याच्या पोस्टर आणि बॅनरवर कुठेही जिल्हाप्रमुख अनिल जगताप व सचिन मूळूक यांना जागा दिली नाही. अगदी सरनाईक यांनी देखील आपल्या भाषणात शिवसेनेतील गतबाजीचा मुद्दा अधोरेखित केला. अगोदरच राजकीय ताकद मर्यादित असलेल्या शिवसेनेत आता गटबाजी उफळल्याने बीडच्या गडात शिवसेनेचा सिंह कशी डरकाळी फोडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com