Beed Shiv Sena: बीडमध्ये ठाकरेंना धक्का ! 'ना'राजीनामे नाट्य सुरूच...

Shiv Sena Thackeray group: काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाने जिल्हा संघटनेत मोठे फेरबदल केले. पण...
Shiv Sena Thackeray group
Shiv Sena Thackeray groupSarkarnama
Published on
Updated on

Beed News: शिवसेनेच्या (Shiv Sena) ठाकरे गटाला बीड जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. बीड बाजार समितीमधील शिवसेनेच्या उपसभापती आणि दोन संचालकांनी बुधवारी ठाकरे गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाने जिल्हा संघटनेत मोठे फेरबदल करत दोन ऐवजी आता तीन जिल्हा प्रमुख नेमले.

पण नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीनंतर पक्षात 'ना'राजीनामे नाट्य सुरू झाले आहे. नव्या कार्यकारीणीत तत्कालिन जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांना डावलण्यात आल्याने राजीनामे देत असल्याचे उपसभापती शामराव पडुळे, संचालक धनंजय गुंदेकर आणि दीपक काळे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले. सध्या बीडमध्ये ठाकरे गटात नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shiv Sena Thackeray group
Dhananjay Munde News : मुख्यमंत्र्यांच्या कौतुकाचे धनी ठरले मुंडे! 'माझीच नजर ना लागो माझ्या या वैभवाला'

गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या जिल्हा संघटनेत फेरबदल करण्यात आले. परमेश्वर सातपुते, रत्नाकर शिंदे व गणेश वरेकर यांची जिल्हा प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली. तर, तत्कालिन जिल्हा प्रमुख अनिल जगताप, माजी मंत्री बदामराव पंडित व बाळासाहेब अंबुरे यांची सहसंपर्क प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली.

नव्या कार्यकारीणीत जिल्हा प्रमुखांची संख्या दोनवरुन तीनवर गेली. मात्र, जुन्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र सुरु झाले. अंबाजोगाई तालुका कार्यकारीणीच्या पदाधिकाऱ्यांनीही मंगळवारी पदांचे राजीनामे दिले आहेत. यापूर्वी परळी, वडवणी तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत.

दरम्यान, अनिल जगताप भविष्यात जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असल्याचे यावेळी राजीनामा दिलेल्या संचालकांनी सांगितले. पक्षाने लोकांमध्ये असलेल्या नेत्यावर अन्याय केला. अनिल जगताप यांच्यावर महत्वाची जबाबदारी देण्याऐवजी पक्षाने त्यांना अकार्यकारी पद दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Shiv Sena Thackeray group
Political News : अहो नाही हो, त्याचा विपर्यास केला! 'त्या' विधानावरून बावनकुळेंनी घेतला 'यू टर्न'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com