Kidnapping Case : बीडमध्ये पुन्हा संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती? ऊसतोड मजुराचे आपहरण करत मारहाण

Beed Sugarcane Worker Assault Case Ganesh Thorat Photo With Walmik Karad : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी डोकं वर काढताना दिसत असून मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या प्रमाणेच एका ऊसतोड मजुराला अपरहण करून जबर मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे.
Beed Crime
Beed Crimesarkarnama
Published on
Updated on

Beed Crime News : मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांचे नाव जरी कोणी घेतले तरी त्यांना झालेली अमानुष मारहाण, व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडिओ यामुळे अंगावर काटा येतो. तर वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगबद्दल संताप अनावर होतो. अशातच आता पुन्हा एकदा अशीच एक घटना बीड जिल्ह्यात घडली असून एका ऊसतोड मजुराचे अपहरण करून त्याचा छळ करण्यात आला आहे. सलग चार दिवस त्या मजुराला जबर मारहाण करत त्याच्या तोंडात लघुशंका करण्यात आली.

बीड जिल्ह्यात वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगने दहशत माजवली होती. तर या दहशतीतूनच विरोध करणाऱ्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांचा 9 डिसेंबर 2024 रोजी काटा काढण्यात आला होता. देशमुख यांचे अपहरण करून त्यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ही हत्या खंडणी प्रकरणात करण्यात आली होती. ज्यात मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याच्यासह सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि इतरांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. तर सध्या हे सर्व आरोपी तुरुंगात आहेत.

देशमुख यांची अत्यंत क्रूर हत्या केल्याचे 15 व्हिडिओ आणि 8 फोटोवरून स्पष्ट झाले होते. धक्कादायक म्हणजे देशमुख यांनी "पाणी, पाणी" करत प्राण सोडले. यानंतर प्रतीक घुले याने संतोष देशमुख यांच्या तोंडावर लघुशंका केली. यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. आता देखील अशीच मारहाणीची पद्धत बीडच्या गेवराई तालुक्यातील धक्कादायक घटनेत दिसून येत आहे.

Beed Crime
Crime News : पहिली पत्नी जिवंत असतानाच थाटले दुसरे लग्न, विरोध होताच पोलीस कर्मचाऱ्याकडून अमानुष मारहाण; व्हिडिओ व्हायरल

तालुक्यातील उमापूर येथील ऊसतोड मजूर देविदास कापसे यांचे उचलीसाठी अपहरण करत मुकादम गणेश थोरात आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तब्बल चार दिवस अमानुष छळ केला. त्याला रक्त येईपर्यंत जबर मारहाण केली. तसेच त्याच्या तोंडात लघुशंका केल्याचा आरोप देविदास कापसे यांने केला आहे. या घटनेमुळे आता बीड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com