Beed News : 'तर महाराष्ट्रातील एकही कारखाना सुरु होणार नाही'! ऊसतोड कामगार संघटना आक्रमक; पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात लढा उभारण्याच्या हालचाली

Beed SugarcaSugarcane Workers Demand Wage Hike: बीडमधील ऊसतोड कामगार व मुकादम संघटनेने ऊसतोडणी आणि वाहतूक मजुरीत १०० टक्के वाढीसह विविध मागण्या केल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.
Beed SugarcaSugarcane Workers Demand Wage Hike
Beed SugarcaSugarcane Workers Demand Wage HikeSarkarnama
Published on
Updated on

Beed SugarcaSugarcane Workers Demand Wage Hike: राज्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होण्यासाठी हालचाली सुरू असताना आता ऊसतोड कामगार व मुकादम संघटना आक्रमक झाल्या आहेत. ऊस तोडणी आणि वाहतूक मजुरी मध्ये 100% वाढ करावी यासह इतर मागण्यासाठी अंतिम इशारा देण्यात आला असून, मागणी मान्य न झाल्यास कारखान्याचे चाकही फिरू देणार नाही अशी भूमिका लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार मुकादम वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

बीडसह शेजारच्या जिल्ह्यातून लाखो ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्र व परराज्यात ऊस तोडीसाठी जातात. या ऊसतोड कामगारांना त्यांच्या कामाचा मोबदला योग्य पद्धतीने मिळावा अशी मागणी आता संघटनेकडून करण्यात आली आहे.

विमा आणि अपघाती मदतीची मागणी

यावर्षीचा दर करार संपला असून, आता नवीन दर करारामध्ये ऊस तोडणी व वाहतूक मजुरी मध्ये शंभर टक्के वाढ करावी, बैलगाडी, गाडी सेंटर, मिनी ट्रॅक्टर ट्रक व वाहतूक दरात 100% वाढ करावी, अशी मागणी संघटनेने केली.प्रत्येक ऊसतोड कामगार आणि मुकादमाचा विमा संबंधित साखर कारखान्याने बंधनकारकपणे काढावा. ऊसतोडणीच्या काळात अपघात होऊन कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.

Beed SugarcaSugarcane Workers Demand Wage Hike
Maharashtra Political Update : गोरेगाव मेट्रो स्थानकाखाली खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला लागली आग

कामगारांच्या मजुरीबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा आणि कुटुंबाच्या आर्थिक आधाराचा प्रश्नही या मागण्यांमधून पुढे आला आहे. त्यामुळे नवीन दर करार करताना केवळ ऊसतोडणीच्या मजुरीचा प्रश्न न पाहता कामगारांच्या सामाजिक सुरक्षेचाही विचार करण्याची मागणी संघटनेने केली.

‘कारखान्याचे चाक फिरू देणार नाही’

दर कराराची मुदत संपल्यानंतर नवीन करारात मजदूरांच्या मागण्या कराव्या अशी संघटनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मागणी मान्य न झाल्यास कारखान्याचे चाकही फिरू देणार नाही, तसेच साखर कारखान्यांचे गाळप सुरू होऊ देणार नाही, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Beed SugarcaSugarcane Workers Demand Wage Hike
Rahul Gandhi News : महाराष्ट्रातील आणखी एका बड्या मंत्र्याची खुर्ची डळमळीत : राजीनाम्यासाठी थेट राहुल गांधींनीच लावली ताकद

पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढा

ऊसतोड कामगार संघटना पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली या मागण्यांसाठी लढा उभारण्यात येईल, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार, वाहतूकदार व मुकादम संघटनेचे अध्यक्ष कृष्णा तिडके यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट करताना मागण्या मान्य करण्याची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com